ETV Bharat / state

पाकिस्तानात लग्नाच्या बेडीत अडकलेल्या नगमाला ठोकल्या बेडया; दोन दिवसांची पोलीस कोठडी - Fake Passport case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 10:40 PM IST

Fake Passport case : सोशल मिडियातून सूर जुळवत थेट पाकिस्तानमध्ये जाऊन लग्नाच्या बेडीत अडकलेल्या नगमाला आज पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. वर्तकनगर पोलिसांनी (Vartaknagar Police) तिला न्यायालयात हजर केले असता तिला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी पुन्हा तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Fake Passport case
नगमाला दोन दिवसांची पोलीस कोठडी (ETV BHARAT Reporter)

ठाणे Fake Passport case : बनावट कागदपत्रावर फेक पासपोर्ट बनवून महिलेनं पाकिस्तानचा दौरा केल्याची घटना बुधवारी घडली होती. या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी या महिलेसह आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी महिलेला अटक केली असून आज वर्तकनगर पोलिसांनी (Vartaknagar Police) तिला न्यायालयात हजर केले असता तिला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोन दिवसांची पोलीस कोठडी : ठाण्याच्या लोकमान्य नगर पाडा नं ४ येथे राहणाऱ्या २३ वर्षीय नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान या विवाहित महिलेचे सोशल मिडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील बशीर अहमद या तरुणाशी सूत जुळले. त्यांनी ऑनलाईन विवाह केला. नंतर बनावट पासपोर्ट आदी कागदपत्रे बनवून ती थेट पाकिस्तानात जाऊन आल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानं वर्तकनगर पोलिसानी गुन्हा दाखल केला. आता, पाच दिवसानंतर पोलिसांनी नगमाला अटक केली आहे. नगमा उर्फ सनम खान आणि तिच्या आईला पोलिसांनी ॲम्बुलन्समधुन वैद्यकिय चाचणी करण्यासाठी नेले आहे. तर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

असा प्रकार आला समोर : सनम खान उर्फ नगमा ही मुळची उत्तर प्रदेशची आहे. तिचं वय 23 वर्ष आहे. तिचं लग्न झालं असून तिला दोन मुली आहेत. पण ती सध्या नवऱ्यापासून विभक्त राहाते. तिची आई ठाण्यात राहाते. उत्तर प्रदेशातून ती थेट तिच्या आईकडे ठाण्याला मुलींसह आली. तिची इन्स्टाग्रामवरून पाकिस्तानातल्या बशीर याच्या बरोबर मैत्री झाली. ते दोघे सहा महिने एकमेकांच्या संर्पकात होते. त्यांच्यात प्रेम झालं. त्यानं सनमला पाकिस्तानात येण्यासाठी सांगितलं. त्याच्या बोलवण्यावरून सनम पाकिस्तानला जाण्यास तयार झाली. तिने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली आणि तिला एक महिन्याचा व्हिसाही मिळाला. ती तिच्या दोन मुलींसह पाकिस्तानात पोहोचली आणि तिथे तिनं लग्नही केलं. एक महिना ती बशीर बरोबर राहिली. एक महिन्याचा व्हिसा तिच्याकडं होता. शिवाय तिची आईही आजारी होती. त्यामुळं तिने ठाण्याला परतण्याचा निर्णय घेतला आणि ती आईकडे आली. त्यानंतर तिला पुन्हा पाकिस्तानला जायचं होतं. यावेळी मात्र, तिला ठाणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तिची चौकशी केल्यानंतर तिने झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय यंत्रणा करत आहेत. दरम्यान पोलिस व्हेरिफीकेशनवेळी मोठी चूक झाल्याचंही समोर आलं आहे.

हेही वाचा -

  1. ‘प्रेमासाठी’ नगमा ‘सनम’ बनून एक महिना राहिली पाकिस्तानात; बनावट पासपोर्टवर केला पाकिस्तानचा दौरा... - Woman Booked For Visit Pakistan
  2. सीमा हैदर जखमी झाल्याच्या कथित व्हायरल व्हिडिओमागं पाकिस्तान, वकिलानं काय केला आरोप? - Seema Haider News
  3. Bride from Pakistan : जोधपूरमध्ये ऑनलाईन निकाह झालेली पाकिस्तानी वधू तब्बल 138 दिवसांनंतर पोचली तिच्या सासरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.