ETV Bharat / state

'बीएमसी'ची अतिक्रमण विरोधी मोहीम; लालबागमधील 138 फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ - Hawkers Hunger Strike - HAWKERS HUNGER STRIKE

Hawkers Hunger Strike : लालबाग मार्केटमधील फेरीवाले लहानसहान वस्तूंची विक्री करून आपलं पोट भरत असतात. फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने 24 जून रोजी कारवाई केली होती. दरम्यान, या अन्यायाविरोधात लालबाग फेरीवाला विक्रेता संघाच्या वतीनं दोन दिवसांचं साखळी उपोषण पुकारण्यात आलं.

Mumbai Hawkers
लालबागमधील फेरीवाले साखळी उपोषण करताना (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 11:34 AM IST

Updated : Aug 3, 2024, 12:35 PM IST

मुंबई Hawkers Hunger Strike : मुंबई हे धावणारं शहर आहे. या धावणाऱ्या शहरात फेरीवाले अनेकदा प्रवासावेळी अडथळा ठरतात. या संदर्भातील एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं बृहन्मुंबई महानगरपालिकेला फटकारल्यानंतर, आता पालिकेनं मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.

'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी शुक्रवारी आंदोलनस्थळावरुन घेतलेला आढावा (ETV Bharat Reporter)

फेरीवाल्यांचं उपोषण : यातील अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाले कोणते आणि किती हा नवा वाद समोर आलाय. या संदर्भात पालिकेने एक सर्वेक्षण देखील केलं होतं. मात्र, या सर्वेक्षणात ज्यांची नोंद पालिकेने केली त्यांना देखील या अतिक्रमण विरोधी मोहिमेत पालिकेनं हटवल्यानं मुंबईतील फेरीवाले आक्रमक झाल्याचं चित्र आहे. पालिकेच्या या कारवाईविरोधात लालबाग येथे फेरीवाला विक्रेता संघाने उपोषण पुकारलं आहे. शुक्रवारपासून हे फेरीवाले उपोषणाला बसले आहेत.

फुटपाथवर साखळी उपोषण सुरू : मुंबईच्या लालबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने 24 जून रोजी कारवाई केली होती. या कारवाईत तब्बल 138 फेरीवाल्यांना हटवण्यात आलं. मात्र, आता 40 दिवस उलटल्यानंतर देखील आपल्याला व्यवसाय करता येत नसल्यानं, लालबाग फेरीवाला विक्रेता संघाने शुक्रवारपासून जिथे ते आपला व्यवसाय करतात, तिथेच फुटपाथवर साखळी उपोषण सुरू केलं. मागील 40 वर्षांपासून इथे व्यवसाय करत असल्याची माहिती काही उपोषणकर्त्यांनी दिली.

न्यायालयात घेणार धाव : या संदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना लालबाग फेरीवाला विक्रेता संघाचे सेक्रेटरी हेमराज परब म्हणाले की, "मागची 40 वर्षे आम्ही इथे व्यवसाय करत आहोत. पालिकेने 2016 मध्ये आमचं सर्वेक्षण देखील केलंय. आता पालिकेने आम्हाला तीन दिवसाची नोटीस देऊन आमच्या पोटावर पाय दिला आहे. केंद्र सरकारने फेरीवाला धोरण अंतर्गत स्त्री-वेंडर्सना एक लाखापर्यंतचं कर्ज देखील जाहीर केलं. आमच्यातील काही फेरीवाल्यांना हे कर्ज मिळालं. मात्र, केंद्र सरकारनं दिलेले हे कर्ज आता फेडायचं कसं हा आमच्या समोर प्रश्न आहे. पालिकेने आमचा व्यवसाय पुन्हा सुरू करू न केल्यास आपण न्यायालयात धाव घेणारआहोत."

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक : मुंबईतील फेरीवाला प्रश्न तापला आहे. याबाबत शिवसेना नेते संजय निरुपम यांच्या पुढाकारानं मुंबईतील फेरीवाल्यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शनिवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काही तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा -

"भाजपाचा कार्यकर्ता महायुतीविरोधात लढणार..."; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला विधानसभेचा प्लॅन - Chandrashekhar Bawankule

"देवेंद्र फडणवीस यांचं मला गुंतवायचं स्वप्न..."- मनोज जरांगे - MANOJ JARANGE PATIL NEWS

लाडक्या बहिणींना विरोध करणारे सावत्र भाऊ- मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर सोडला बाण - Eknath Shinde Attack On Thackeray

Last Updated : Aug 3, 2024, 12:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.