ETV Bharat / state

शाळेच्या शौचालयात दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार, 23 वर्षीय नराधमाला ठोकल्या बेड्या - Thane Rape News - THANE RAPE NEWS

Thane Rape News : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचाराचं प्रकरण समोर आलय. शौचालयात जात असताना शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानं त्यांच्यावर बळजबरीनं अत्याचार केला. पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आरोपी नराधमाला अटक करण्यात आलीय.

Thane Rape News
संग्रहित छायाचित्र (Source - Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 17, 2024, 8:50 PM IST

ठाणे Thane Rape News : बदलापूर येथील प्रसिद्ध शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानं चार वर्षांच्या दोन विद्यार्थिनींवर शाळेच्या शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आरोपी नराधमाला अटक करण्यात आली. अक्षय शिंदे (वय 23) असं अटक केलेल्या नराधमाचं नाव आहे. या घटनेमुळे शाळेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद : राज्यासह देशभरात महिला विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाच्या घटना वाढत असताना, शालेय व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करणं अपेक्षित आहे. मात्र, बदलापुरात घडलेल्या शाळेतील प्रकरणात पोलीस तपासादरम्यान शाळेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याची बाब समोर आली आहे. यातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा व्यवस्थापनाचं दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलय. बदलापूर येथील ही शाळा शहरातील सर्वात मोठी, प्रसिद्ध आणि सर्वात जुनी शैक्षणिक संस्था आहे. या शाळेत मुलींचे वर्ग सकाळच्या सत्रामध्ये भरतात. पीडित अल्पवीयन विद्यार्थिनींनी शौचालयात जात असताना शाळेतील सफाई कर्मचाऱ्याला भाऊ म्हणून हाक मारली, मात्र या नराधमानं त्यांच्यावर बळजबरीनं अत्याचार केला.

पीडित विद्यार्थिनीनं पालकांना दिली माहिती : याबाबत एका पीडित विद्यार्थिनीनं तिच्या पालकांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी तिच्यासोबत राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीच्या पालकांशी संपर्क साधला, तर दुसऱ्या मुलीच्या पालकांनी आपली मुलगीही शाळेत जाण्यास घाबरत असल्याचं सांगितलं. त्यामुळे दोन्ही मुलींच्या पालकांनी जवळच्या डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली असता, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं. यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बदलापूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पॉक्सो प्रकरण असूनही गुन्हा दाखल करण्यासाठी 17 तासाचा कालावधी घेतला.

नराधमाला ठोकल्या बेड्या : सामाजिक कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यानंतर शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आज 17 ऑगस्ट रोजी आरोपीला अटक करण्यात आली. या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त एस. एच. वऱ्हाडे म्हणाले, "आम्ही या प्रकरणी पॉक्सो कायदा आणि बीएनएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीला उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे."

हेही वाचा

  1. शॅम्पू आणि हॅन्ड लिक्विड बाटलीत सापडलं 20 कोटींचं कोकेन; मुंबई विमानतळावरून परदेशी महिलेला ठोकल्या बेड्या - Cocaine Seized
  2. बहिणींनो राखी बांधायला जायचं! मग बघा मुंबई लोकलचं वेळापत्रक, 'या' मार्गावर आहे मेगॉब्लॉक - Mumbai Mega Block
  3. बृहन्मुंबई महानगरपालिका अ‍ॅक्शन मोडवर! रस्त्यांवर विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची होणार तपासणी - Mumbai Street Food inspection

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.