ETV Bharat / state

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी रस्सीखेच : फडणवीसांची चालणार जादू?: नाना पटोलेंचा विजयाचा दावा - Vidhan Parishad Elections

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 9, 2024, 5:40 PM IST

Vidhan Parishad Elections : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुतीसह महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे.

Nana Patole
नाना पटोले (Etv Bharat Reporter)

मुंबई Vidhan Parishad Elections : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून त्यानुसार रणनीती आखण्यात आली आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून, घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. महायुतीचे 9 उमेदवार निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी घेतली आहे. 2022 मध्ये त्यांनी दाखवलेल्या करिष्म्याची पुनरावृत्ती होणार का, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडं महाविकास आघाडीही आपले तीन उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

नाना पटोले यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

11 जागांसाठी 12 उमेदवार : विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक महायुती तसंच महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले होतं. मात्र, अखेर 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्यानं ही निवडणूक रंजक होणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या पक्षानं राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेनं माजी खासदार भावना गवळी, कृपाल तुमाने यांना उमेदवारी जाहिर केलीय. त्यामुळं महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उबाठा) मिलिंद नार्वेकर, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं कोणाचा पत्ता कट होणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

विधानभवनातच निवडणुकीची चर्चा : सध्या विधानभवनाच्या आवारात सर्वच पक्षांचे उमेदवार निवडणुकीची चर्चा करत आहेत. तसंच पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या भेटी-गाठी घेत आहेत. यामध्ये अपक्ष आमदारांना अधिक महत्त्व प्राप्त झालं असून बहुजन विकास आघाडी, प्रहार जनशक्ती, मनसे या छोट्या घटक पक्षांचं महत्त्व वाढलं आहे. 288 आमदारांपैकी 14 जागा रिक्त असल्यानं एकूण 274 आमदार मतदान करतील. आमदारांना विजयी होण्यासाठी 23 (22.84) मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेना (उबाठा) राष्ट्रावादी काँग्रेसनं आपल्या आमदारांना 10, 11, 12 असे तीन दिवस पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याची व्यवस्था केल्याचं वृत्त आहे. मंगळवार 9 जुलै हा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा 10 वा दिवस आहे. 12 जुलै हा शेवटचा दिवस असल्यानं या दिवशी मतदान होणार आहे.

दोन्ही बाजूनं ठाम विश्वास : या निवडणुकीविषयी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "आम्ही आमच्या परीनं रणनीती आखली असून आमच्या आमदारांना कुठल्या हॉटेलमध्ये ठेवायचं याबाबत काँग्रेस प्रभारी निर्णय घेणार आहेत. तसंच महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील", असा ठाम विश्वाससुद्धा नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना उद्योग मंत्री, उदय सामंत म्हणाले, "आमच्या आमदारांवर आमचा ठाम विश्वास असून पक्षाशी एकनिष्ठ असल्यानं त्यांना कुठल्या हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज आम्हाला दिसत नाही. ज्यांना त्यांचं मत फुटतील अशी भीती वाटते तेच अशा पद्धतीचे प्रयत्न करतात. महायुतीचे 9 उमेदवार हमखास जिंकून येतील याची पूर्ण खात्री" असल्याचंही उदय सामंत म्हणाले आहेत.

फडणवीसांची चालणार जादू? : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला असला, तरी 2022 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत फडवणीस यांची जादू चालली होती. तीच परिस्थिती आता असून त्या पद्धतीची रणनीती फडणवीस यांनी आखली आहे. या निवडणुकीची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत महायुतीला हार पत्करावी लागली होती. परंतु आता ही निवडणूक फडणवीस यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची झालेली असून कुठल्याही परिस्थितीत त्यांना आपली जादूची कांडी फिरवावी लागणार आहे. अन्यथा महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर येणार यात शंका नाही.

'हे' वाचलंत का :

  1. वरळी हिट अँड रन प्रकरण : मिहिर शाह आणि मुख्यमंत्र्यांचे व्यावसायिक संबंध, संजय राऊतांचा गंभीर आरोप - worli hit and run case
  2. केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना मोठा दिलासा; विधानसभा निवडणुकीपूर्वी दिला 'हा' निर्णय - ECI on NCP SCP
  3. फुकटचे निर्णय हिताचे नसतात; शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला - Sharad Pawar On Farmers

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.