ETV Bharat / state

खराब रस्त्यानं घेतला बळी; वेळेवर उपचार न मिळाल्यानं आदिवासी तरुणीचा मृत्यू - Budhana News - BUDHANA NEWS

Tribal Girl Died: बुलढाणा जिल्ह्यातील अतीदुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना आजही रस्त्याअभावी, वैद्यकीय सुविधांअभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. गोमाल इथल्या 16 वर्षीय मुलीला वेळेवर उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या घटनेमुळं गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

Budhana News
तरुणीला झोळीला बांधून नेताना नातेवाईक (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2024, 1:56 PM IST

बुलढाणा Budhana News : बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातल्या सातपुड्याच्या पर्वतरांगेत असलेल्या गोमाल या आदिवासी गावातील सोळा वर्षीय तरुणीचा रस्त्याअभावी मृत्यू झालाय.

रस्त्याअभावी तरुणीचा मृत्यू (Source - ETV Bharat Reporter)

नेमकं प्रकरण काय? : गोमाल गावातील सागरी हिरू बामन्या (वय -16 वर्ष) या मुलीला काल सायंकाळच्या सुमारास अचानक उलट्या सुरू झाल्या. मुलीची यांची प्रकृती खालावत असल्यानं ग्रामस्थांनी तीला झोळी बांधूनच उपचारासाठी नेण्याचं ठरवलं. मात्र, रूग्णालय थोड्याच अंतरावर असताना मुलीचा मृत्यू झाला. रस्ता आणि आरोग्य सुविधेच्या अभावामुळं या मुलीला आपला जीव गमवावा लागला. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीचा मृत्यू झाल्यानंतरही मृतदेह झोळी बांधूनच घरी आणावा लागला.

ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण : राज्य सरकार नवीन नवीन योजनांच्या घोषणा करत आहे. राज्यातील महिला व मुलींसाठी सरकारकडून लाडकी बहिण याेजना राबविली जात आहे. परंतु गावात राहणाऱ्या याच लाडक्या बहिणींना उपचार मिळत नाहीय. गावातील महिलांसाठी कोणत्याही प्रकारची प्राथमिक आरोग्य यंत्रणा सुद्धा नाहीय. एवढंच नाही, तर गावापासून शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी पक्के रस्ते सुद्धा गावात नाहीत. गोमाल गावातील मुलीच्या मृत्यूमुळं ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या घटनेचा भीम आर्मीतर्फे जाहीर निषेध करण्यात आलाय.

हेही वाचा

  1. शंभर वर्षे जुनी इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून एका महिलेचा मृत्यू, तर तीन जण गंभीर - Amravati Building Collapsed
  2. रेशनच्या दुकानात दिला जातोय 'प्लास्टिक तांदूळ', पौष्टिक असल्याचा प्रशासनाचा दावा - Plastic Rice
  3. चंद्रपूरात वाढत्या बलात्काराच्या घटना चिंताजनक; कृती आराखडयाची प्रतीक्षा - Chandrapur Rape Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.