ETV Bharat / state

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; BMC अतिरिक्त आयुक्तपदी अभिजीत बांगर, तर अश्विनी भिडेंची 'या' जागेवर झाली बदली - Chartered Officers in Maharashtra

IAS Officers Transfers : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. इक्बाल सिंग चहल यांना नुकतेच मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून हटविण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Officers Transfers
IAS Officers Transfers
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 10:57 PM IST

Updated : Mar 20, 2024, 10:16 AM IST

मुंबई IAS Officers Transfers : IAS अधिकाऱ्यांच्या आज राज्यात तातडीनं बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इक्बाल सिंग चहल यांची नुकतीच मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, या पदावर अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांचीही बदली करण्यात आली आहे.

BMC अतिरिक्त आयुक्तपदी अभिजीत बांगर : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. अमित सैनी यांची मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तर अंकित यांची बुलढाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुभम गुप्ता यांची जळगावच्या जिल्हाधिकारीपदी, तर विशाल नरवडे यांची धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांचीही पदावरून हटविण्यात आलं आहे. मात्र, त्यांची अद्याप बदली झालेली नाही. तर, संजय मीना यांची नागपूरच्या एनएमआरडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून मनोजकुमार सूर्यवंशी यांनाही पदावरून हटवण्यात आलं आहे. मात्र, त्यांना बदली दिलेली नाहीय.

'या' अधिकाऱ्यांच्या बदल्या :

1. अश्विनी भिडे, एमडी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (रिक्त पदावर)

2. श्री अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त, BMC

3. श्री अंकित, सीईओ, झेडपी, बुलढाणा

4. शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगाव

5. श्री विशाल नरवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., धुळे

6. श्री अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त, बीएमसी

7. श्री पी वेलरासू, (प्रतीक्षेत)

8. TMC आयुक्त (कोणताही आदेश नाही)

९. संजय मीना, आयुक्त, एनएमआरडीए, नागपूर

10. श्री मनोजकुमार सुत्र्यवंशी (प्रतीक्षेत)

हे वाचलंत का :

  1. Arvind Sawant : ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे यांची भाषा आणि भूमिका बदलली - अरविंद सावंत
  2. MNS BJP Alliance : मनसेच्या इंजिनला कमळाचं इंधन, भाजपासोबत युती झाल्यास मनसेचा फायदा काय? जाणून घ्या समीकरण
  3. Rajan Salvi : "माझ्या कुटुंबियांना...", एसीबीच्या चौकशीनंतर आमदार राजन साळवी यांची प्रतिक्रिया

Last Updated : Mar 20, 2024, 10:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.