ETV Bharat / state

Drug Racket Exposure : 'त्या' आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा व्यवहार हवालामार्फत? 9 जणांना अटक - Action against drug racket

Drug Racket Exposure : पुणे पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा खुलासा केला आहे. यामध्ये या रॅकेटचा व्यवहार हवालामार्फत सुरू असल्याचं पुढं आलं आहे.

Drug Racket Exposure
ड्रग्ज रॅकेटचा खुलासा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 6:12 PM IST

पुणे Drug Racket Exposure : पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली आणि सांगली येथे कारवाई करत जवळपास ३,६०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांना अटक देखील केली असून आता हे आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट उद्ध्वस्त करताना या रॅकेटचा व्यवहार हवालामार्फत सुरू असल्याचं पुढं आलं आहे. यामुळे हवाला व्यवहाराची 'लिंक' शोधण्यास गुन्हे शाखेने सुरुवात केली आहे.

पाच व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात : या प्रकरणाचा तपास करत असताना यामध्ये पाच व्यक्ती पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यामध्ये दोन व्यापारी हे पुण्यातील तर एक व्यापारी आणि दोघे सराफा व्यावसायिक हे दिल्लीतील असल्याचं समोर आलं आहेत. यांच्यामार्फत आजवर मुख्य आरोपी संदीप धुनिया ड्रग प्रकरणातील पैशांचे व्यवहार करत होता, असं तपासात समोर आलं आहे.

सराफा व्यापारीही हवाला व्यवसायात : पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे छापे टाकून ३,६०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन हस्तगत केले आहे. या ड्रग्ज प्रकरणातील जो मुख्य आरोपी संदीप धुनिया असून याच्या प्रेयसीच्या चौकशीत पुण्यातील दोन हवाला व्यापाऱ्यांची माहिती मिळाली होती. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी दिल्लीतील तिघांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांचे पथक दिल्लीला गेले. तेथे तिघांची चौकशी केली असता, त्यातील दोघे सराफा व्यापारी निघाले. दिल्लीतील हवालाची रोकड घेणारा व्यक्ती ही रोकड दोघा सराफांकडे द्यायचा. यानंतर ती रोकड संदीप धुनियाकडे लंडनला जात असल्याचं तपासात पुढे आलं आहे.

काश्मिरी चरस जप्त : पोलीस प्रशासन आणि अंमली पदार्थ विरोधी पथक वारंवार ड्रग्ज तस्करांविरुद्ध कारवाई करत असते. याचा प्रत्यय 22 डिसेंबर, 2023 रोजी मुंबईत आलेला होता. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटनं आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला होता. यात सुमारे 1.04 कोटी किमतीचं 2.600 किलो काश्मिरी चरस जप्त केलंय. तसंच इतर कारवाईत 22 लाख रुपये रोख आणि एक दुचाकीसह 120 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त केलंय. असा एकूण 1.51 कोटी ड्रग्ज हस्तगत करून विशेष ऑपरेशनमध्ये एका काश्मिरी व्यक्तीसह सहा ‘ड्रग पेडलर’ पकडल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी दिली होती.

काय-काय केलं जप्त : या प्रकरणी 22 लाखाची रोकड माहीम, डोंगरी, घोडपदेव, दोन टाकी, नागपाडा परिसरातून हस्तगत करण्यात आलीय. या एमडी ड्रग्जची किंमत 25 लाख आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ विकणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली असून यात एका काश्मिरी व्यक्तीला देखील अटक करण्यात आलीय. अंमली पदार्थ तस्करांनी जम्मू काश्मीरमधून काश्मिरी चरस आणलं होतं. जम्मू काश्मिरमधील अनंतनाग इथं राहणाऱ्या काश्मिरी आरोपीचं नाव हाजी अब्दुल रेहमान होतं. हाजी अब्दुल रेहमानसह सरताज अहमद मुमताज मन्सुरी आणि कैलास दीपक कनोजिया या दोघांना देखील बेड्या ठोकण्यात आल्या असून ही दोघं पूर्वी उत्तर प्रदेशात राहत होते. कनोजिया याचं मुंबईत टेलरिंगचं दुकान असून अक्रोड विक्रीच्या नावाखाली ही आंतरराज्यीय टोळी अंमली पदार्थ विकत होते.

हेही वाचा :

  1. आग्रीपाड्यातून 58 लाखांची चरस जप्त, दोन ड्रग्ज तस्करांना अटक
  2. मुंबईत मोठी कारवाई; 22 लाखांच्या रोकडसह 1 कोटींचं काश्मिरी चरस जप्त
  3. कार्डेलिया ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडेंना दिलासा, 10 जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.