ETV Bharat / state

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या पदव्युत्तर विद्यार्थ्याचा आढळला मृतदेह - Found TISS PG Student Dead Body - FOUND TISS PG STUDENT DEAD BODY

Found TISS PG Student Dead Body : चेंबूर इथल्या घरात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेमध्ये (TISS) पदव्युत्तर विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला आहे. या विद्यार्थ्यानं त्याच्या वर्गमित्रांसह पार्टी केल्याची माहिती पुढं आहे. अनुराग जैस्वाल असं त्या मृतदेह आढळलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील लखनऊचा होता.

Found TISS PG Student Dead Body
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2024, 10:40 PM IST

मुंबई Found TISS PG Student Dead Body : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा (TISS) एक पदव्युत्तर विद्यार्थी रविवारी सकाळी त्याच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला आहे. चेंबूर पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, "अनुराग जैस्वाल नावाच्या विद्यार्थ्यानं शनिवारी रात्री वाशी इथं मित्र आणि वर्गमित्रांसह पार्टी केली. पार्टी झाल्यानंतर रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ते घरी आले आणि सकाळी अनुराग जैस्वाल उठला नाही. तेव्हा इतर 3 मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता, ही घटना उघडकीस आली. त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आलं. याबाबत चेंबूर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे, अशी माहिती चेंबूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ सावंत यांनी दिली.

वर्गमित्रांसह केली पार्टी : टीसचा विद्यार्थी अनुराग जैस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशातील लखनऊचा रहिवासी असून तो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये एचआर प्रोग्रामचा अभ्यास करण्यासाठी मुंबईत आला होता. तो चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चेंबूर नाका परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये इतर तीन वर्गमित्रांसह राहत होता. पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की, "चौकशीदरम्यान आम्हाला समजलं आहे की, अनुराग जैस्वालनं आदल्या रात्री नवी मुंबईतील वाशी भागात आपल्या वर्गमित्रांसह एका पार्टीत हजेरी लावली होती. तो मद्यधुंद अवस्थेत होता. पहाटे 3 वाजताच्या सुमारास तो घरी आला आणि झोपला होता. पण तो सकाळी उठला नाही. सकाळी तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याच्या वर्गमित्रानं त्याला चेंबूरमधील सुश्रुत रुग्णालयात नेलं. तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं."

उत्तर प्रदेशातील होता विद्यार्थी : लखनऊ इथं राहणाऱ्या अनुरागच्या पालकांना या घटनेची माहिती देण्यात आली असून ते लवकरच मुंबईला पोहोचणार आहेत. जैस्वाल याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आला असून सोमवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. "अनुराग जैस्वाल याच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत, याची सत्यता जाणून घेण्यासाठी पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत," असे पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी सांगितलं. "पोलिसांचं एक पथक जैस्वाल याच्या वर्गमित्रांचे जबाब नोंदवत आहे. तसेच आणखी एक पथक वाशी इथं जाऊन त्यांनी मद्यपान कुठं केलं, पार्टी कुठे झाली होती, याची चौकशी करत आहे."

हेही वाचा :

  1. नाशिक; निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची निर्घृण हत्या - Brutal murder
  2. प्रेयसीकडून प्रियकराचा गेम; दोन लाखांची सुपारी देऊन केली हत्या, 5 आरोपींना अटक - Girlfriend killed boyfriend
  3. कोलकाता बलात्कार खून प्रकरणानंतर अर्जुन कपूरनं रक्षाबंधननिमित्त पुरुषांना दिला संदेश - Raksha Bandhan 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.