ETV Bharat / state

चिरोडी मालखेड गावात पुन्हा वाघाची दहशत, वनविभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Tiger terror in Chirodi Malkhed

Tiger terror in Chirodi Malkhed : पोहरा मालखेड जंगलात गेल्या काही दिवसांपासून वाघ फिरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळं गावकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागानं सतर्कतेचा इशारा दिलाय.

Tiger terror in Chirodi Malkhed
मालखेड गावात वाघाची दहशत (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 10:49 PM IST

अमरावती Tiger terror in Chirodi Malkhed : अमरावती शहरालगत असलेल्या पोहरा मालखेड जंगलात गेल्या काही दिवसांपासून वाघ असल्याचा दावा नागरिकांनी केलाय. चांदूर रेल्वे वन परिमंडळांतर्गत येणाऱ्या चिरोडी मालखेड या गावातील जंगलात वाघांचा वावर असल्यानं वनविभागानं ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा वाघानं या परिसरात मुक्काम केला ठोकला आहे. गेल्या 13 वर्षांत वाघ दिसण्याची ही सलग पाचवी घटना आहे.

गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया (Etv Bharat Reporter)
  • गावामध्ये भीतीचं वातावरण : पोहरा मालखेडच्या जंगलात वाघ दिसल्यानंतर वनविभागानं पोहरा, चिरोडी, मालखेड या गावांमध्ये गावकऱ्यांना इशारा देण्यासाठी पोस्टर लावलं आहे. विशेष म्हणजे या गावातील अनेकांना रात्रीच्या वेळी जंगल परिसरात तसंच मुख्य रस्त्यावर वाघ दिसल्यानं या गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

गुराखी धास्तावले : मालखेड, पोहरा, राजुरा, चिरोडी, कार्लासारख्या जंगली गावात अनेक लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीसह पशुपालन आहे. त्यामुळं या गावांतील गुराखी आपल्या जनावरांना चरण्यासाठी घेऊन वनक्षेत्रात जातात. मात्र, आता जंगलात वाघ आल्यानं गुराख्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळं ते आपल्या जनावरांची विशेष काळजी घेत आहेत. मालखेड वनपरिक्षेत्रात वाघांनं गायीची शिकार केल्यानं या भागातील गुराखी सावध झाले आहेत.

वाघाचं जंगलात कायम वास्तव्य नाही : पोहरा मालखेड आणि शिरोडी जंगल परिसरात यापूर्वी 2011, 2016, 2018, 2021 आणि आता 2024 मध्ये रहिवाशांना वाघ दिसला. वनविभागाचं पथक जंगलात गस्त घालून सतत वाघावर लक्ष ठेवत आहे. या जंगलात 13 वर्षात पाच वेळा वाघ दिसलाय. मात्र, वाघाचं या जंगलात कायम वास्तव्य नसल्याचं राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. 1992 पासून पोहरा मालखेड जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळावा, यासाठी मागणी होत आहे.

यापूर्वी असे आलेत वाघ : " पोहरा मालखेडा जंगल परिसरात यापूर्वी 2011 मध्ये वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पामधून वाघ आला होता. 2016 मध्ये नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर कोंढाळी जंगलातून पोहरा जंगल परिसरात वाघ आला. हा वाघ नेमका कुठून आला, याचा शोध वनविभागानं घ्यायला हवा. खरंतर पोहरा, मालखेड, चिरोडी जंगलात वाघाचा संचार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, टिपेश्वर अभयारण्य, बोर व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा महत्त्वाचा हा संचार मार्ग आहे. यामुळंच या एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाणारा वाघ पोहरा मालखेड जंगल परिसरात दिसलाय. ते वाघ या जंगलात फार काळ राहणार नाही, तो निश्चितच या भागातून निघून जाईल," अशी माहितीदेखील यादव तरटे पाटील यांनी दिली.

वनविभाग वाघावर लक्ष ठेवून : पोरा मालखेड चिरोडीच्या जंगल परिसरात सध्या वाघाबाबत वनविभाग सतर्क आहे. चांदुर रेल्वे वन विभागाचं या वाघाकडं लक्ष आहे. वाघ असणाऱ्या परिसरात मानवी संचाराला आळा घालण्याचा प्रयत्न वनविभागाच्या वतीनं केला जातोय. वन्यप्राणी आणि मनुष्य यांच्यात संघर्ष होऊ नये, याची काळजीदेखील वनविभागाच्या वतीनं घेतली जात आहे. ग्रामस्थांनी देखील जंगलात वाघ असल्यामुळं सतर्कता बाळगावी, असं आवाहन वनविभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.