ठाणे Building Slab Collapse In Thane : कळवा परिसरातील ओम कृष्णा इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडून तिघेजण गंभीर जखमी झाले. मयूर दांडेकर, मनोहर दांडेकर आणि मनीषा दांडेकर असं जखमी झालेल्या नागरिकांची नावं आहेत. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडल्यानंतर महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ओम कृष्णा सोसायटीमधील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला : कळवा परिसरातील ओम कृष्णा सोसायटीमधील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडून दांडेकर कुटुंबातील मयूर दांडेकर, मनोहर दांडेकर आणि मनीषा दांडेकर हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत इमारत 35 वर्षे जुनी असून महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ ही इमारत रिकामी करत या इमारतीमध्ये राहणाऱ्या तीस कुटुंबीयांना इमारती बाहेर काढले आहे या इमारतीमध्ये जवळपास 100 नागरिक राहत होते महानगरपालिका प्रशासनाने इमारत रिकामी करून या इमारतीच्या भोवती धोका असल्याची पट्टी देखील लावलेली आहे.

कळवा परिसरात अनेक इमारती धोकादायक : कळवा परिसरामध्ये अनेक इमारती या धोकादायक आणि अति धोकादायक वर्गामधील आहेत. पावसाळा आला की इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना इमारत कोसळण्याची भीती वाटते. राज्य सरकारनं क्लस्टर योजना आखली, मात्र ती प्रत्यक्षात येण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे हजारो नागरिक आजही या क्लस्टर योजनेच्या प्रतीक्षेत आहेत.

इमारत कोसळण्याचा ठाण्यातील इतिहास : ठाण्यात इमारत कोसळून बळी जाणाऱ्या शेकडो नागरिकांचा अनेक दशकांचा इतिहास आहे. या अपघातांची सुरुवात पंचवीस वर्षांपूर्वी किसन नगरमधील साईराज इमारत कोसळून सुरू झाली. त्यानंतर अनेक इमारती कोसळल्या, यामध्ये अनेकांचा जीव गेलेला आहे. शिळ परिसरातील आदर्श इमारत कोसळून 74 नागरिकांचा बळी गेला. पावसाळा आला की धोकादायक इमारतीमधील राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे महानगरपालिका दरवर्षी धोकादायक अति धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते.

हेही वाचा :
- विक्रोळीत मुसळधार पावसामुळं इमारतीचा स्लॅब कोसळला; बाप-लेकाचा मृत्यू - Mumbai Vikhroli News
- Shahaji Bapu Patil Room Slab Collapse : आमदार निवासातील खोलीचा स्लॅब कोसळला, शहाजी बापू थोडक्यात बचावले
- Pune Building Slab Collapse : स्लॅब कोसळून मृत पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना शासनाकडून पाच लाखांची मदत