मुंबई Threatening Call To GRP : मुंबईतील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे आरडीएक्स ठेवल्याबद्दल सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) नियंत्रण कक्षाला कॉल आला. हा कॉल आज (9 ऑगस्ट) सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आला होता. यानंतर जीआरपी पोलिसांची तारांबळ उडाली होती. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मुंबई पोलीसदेखील कॉल करणाऱ्याचा शोध घेत आहेत.
कॉलरचे लोकेशन मिळाले : आज सायंकाळी जीआरपी नियंत्रण कक्षास आलेल्या या कॉलमुळे एकच खळबळ उडाली होती. संपूर्ण 'सीएसएमटी' रेल्वे स्टेशन पिंजून काढत पोलिसांनी तपासणी केली. मात्र काहीही आढळून आलेले नाही. कॉल करण्याऱ्या अज्ञात व्यक्तीचे कॉल करतानाचे लोकेशन 'सीएसएमटी' दिसत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
संशयास्पद वस्तू आढळलेल्या नाहीत : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज सायंकाळी एका अज्ञात व्यक्तीनं 'सीएसएमटी' येथे 'आरडीएक्स' ठेवल्याचा दावा केला. कॉल येताच जीआरपी पोलिसांनी सर्व रेल्वे युनिटला माहिती दिली. या कॉलनंतर पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये जाऊन संपूर्ण 'सीएसएमटी' रेल्वे स्थानकाचा शोध घेतला. परंतु काहीही संशयास्पद सापडले नाही.
फोन केल्यानंतर मोबाईल केला बंद : एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेने मुंबई पोलिसांना देखील या कॉलबाबत माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, जेव्हा कॉलरचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा ते लोकेशन 'सीएसएमटी' जवळच आढळले. काही वेळातच त्या व्यक्तीनं मोबाईल बंद केला आला. आता मोबाईल लोकेशन सापडत नाही आहे. परंतु, मोबाईल नंबर ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्यानं बिहार आणि मरोळ येथील पत्त्यावर मोबाईल सिम घेतल्याची माहिती समोर आली आहे.''
हेही वाचा:
- ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळ बॉम्बनं उडवून देणार; मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला धमकीचा फोन - Mumbai Police Threat Call
- सलमान खाननंतर आता जितेंद्र आव्हाडांना धमकीचा फोन; बिष्णोई गँगचा हात? - Jitendra Awhad Threat Call
- इंडिगोच्या 40 विमानांना बॉम्बनं उडवण्याची का दिली धमकी? वाचा काय दिलं तरुणानं उत्तर