ETV Bharat / state

मुंबईचा 'MBA पानवाला'! लाख रुपये पगाराची नोकरी सोडून विकतोय पान; आता करोडोची कमाई - The Paan Story Mumbai - THE PAAN STORY MUMBAI

The Paan Story Mumbai : वडिलोपार्जित व्यवसाय न करता आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं व मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करावी, अशी अनेक आई-वडिलांची इच्छा असते. व्यवसायात आज पैसा आहे तर उद्याचं काही सांगता येत (MBA Graduate Sells Paan) नाही, अशी धारणा अनेकांची असते. त्यामुळं महिन्याला पगार घ्या व आरामत आयुष्य जगा, याप्रमाणं व्यवसायात रिस्क न घेता अनेकजण नोकरीचा पर्याय निवडतात. मात्र, मुंबईतील 'MBA पानवाला'ची कहाणी कुछ और ही है! वाचा 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट....

The Paan Story Mumbai
मुंबईचा पानवाला (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 4:26 PM IST

Updated : Sep 2, 2024, 7:53 PM IST

मुंबई The Paan Story Mumbai : आजोबा, वडिलांपासून चालत आलेल्या पानाचा व्यवसाय आपल्या मुलानं न करता, पान न विकता चांगलं (MBA Graduate Sells Paan) शिक्षण घ्यावं, चांगल्या ठिकाणी नोकरी करावी, अशी इच्छा इतर पालकांप्रमाणं यांच्या देखील पालकांची होती. आई-वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी 'एमबीए' केलं. चांगल्या मार्कानं पास झाले. महिन्याला लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली. पगार पाहून एक चांगलं स्थळ आलं आणि विवाह देखील झाला. पण, त्यांनी नोकरी सोडून पानाचा पिढीजात व्यवसाय पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला घरातून विरोध झाला. मात्र, त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. ही कहाणी एखाद्या चित्रपटाची नसून मुंबईचा नौशाद शेख (The Paan Story Founder Naushad Shaikh) या व्यावसायिकाची आहे.

'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट (Source - ETV Bharat Reporter)

नोकरी सोडून व्यवसाय केला सुरू : नौशाद शेख यांच्या आजोबा आणि वडिलांचा पानाचा व्यवसाय होता. "हा व्यवसाय न करता मी काहीतरी शिकून मोठं करावं, अशी माझ्या घरच्यांची इच्छा होती. घरची परिस्थिती तशी साधीच. पण, वडिलांनी प्रचंड कष्टानं आणि मेहनतीनं मला शिकवलं. माझं 'एमबीए'चं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मला एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी देखील लागली. घरी सर्व सुरळीत सुरू होतं. मात्र, मोठा पगार असून देखील माझं त्या कामात मन लागत नव्हतं," असं नौशाद सांगतात. नोकरी सोडून आपल्या शिक्षणाचा वापर करून वडिलोपार्जित व्यवसाय पुढे न्यावा, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, व्यवसाय करणं आपल्याला शक्य आहे का? या विचारात नौशाद होते. पुढं काय झालं वाचा खाली...

'द पान स्टोरी' नावाचा ब्रँड सुरू : उच्च शिक्षणाचा वापर करून आपण काहीतरी वेगळं करावं आणि आपला वडिलोपर्जित व्यवसाय पुढं न्यावा, आपला एक स्वतःचा पानाचा ब्रँड असावा, अशी नौशाद यांची इच्छा होती. 'एमबीए'चं शिक्षण घेत असताना नौशाद यांना एक प्रोजेक्ट करावा लागला होता. नौशाद यांच्या इतर सहकाऱ्यांनी विविध प्रोजेक्ट सबमिट केले. मात्र, नौशाद यांनी आपल्या पानाच्या व्यवसायावर आधारिक एक प्रोजेक्ट कॉलेजमध्ये सादर केला. ही संकल्पना त्यांच्या मित्रांना आवडली नाही. मात्र, त्यांच्या शिक्षकांनी पानाच्या व्यवसायाच्या संकल्पनेचं कौतुक केलं. नौशाद सांगतात, "माझ्या आजोबांनी, वडिलांनी तंबाखू युक्त पान विकलं. मात्र, मला तसं करायचं नाही. मला लोकांच्या आरोग्याशी खेळायचं नाही. त्यामुळं मी 'द पान स्टोरी' नावानं स्वतःचा ब्रँड सुरू करण्याचं ठरवलं."

पानाची होते होम डिलिव्हरी : मुंबईतील कुर्ला येथे राहणाऱ्या नौशाद यांनी माहीम दर्गा भागात एक छोटं दुकान घेतलं. तिथं त्यांनी 'द पान स्टोरी' या ब्रँडची सुरुवात केली. आज नौशाद यांच्या इथं विविध फ्लेवर्समध्ये पान उपलब्ध आहेत. 2019 मध्ये त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. त्यातच कोरोना आला. मात्र, नौशाद यांना पानाच्या व्यवसायानं तारलं. नौशाद यांच्या व्यवसायाचा फंडा साधा आणि सोपा आहे. आज तुम्हाला पान खरेदी करण्यासाठी पान शॉपवर जावं लागतं. मात्र, नौशाद यांनी स्विगी, झोमॅटो, होम डिलिव्हरी यांसारखे ई-कॉमर्सचे पर्याय ग्राहकांसाठी ठेवले आहेत. आज त्यांचं पान संपूर्ण मुंबईमध्ये डिलिव्हर होतं. नौशाद यांची पान स्टोरी सोशल मीडियावर देखील चर्चेत आहे. आज त्यांच्या दुकानात रशिया, जपान यांसारख्या विविध देशातून परदेशी पाहुणे खास पान खाण्यासाठी येतात.

इव्हेंटमधून नौशाद यांची करोडोंची कमाई : नौशाद यांचं पानाचं दुकान तर आहेच, पण त्यांनी इव्हेंटवर देखील लक्ष केंद्रित केलं. नौशाद सांगतात, "माझा पहिला इव्हेंट हा मुंबईतील प्रसिद्ध 'ताज पॅलेस' या हॉटेलमध्ये झाला. मला पहिली ऑर्डर तिथून आली. मी हॉटेल 'ताज पॅलेस' येथे पानाचा स्टॉल लावला होता. अनेकांना पान आवडलं आणि त्यानंतर मला अनेक मोठमोठ्या ऑर्डर येऊ लागल्या. आज घडीला फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण देशभरातून मोठमोठ्या इव्हेंटच्या ऑर्डर आम्हाला येत आहेत." नौशाद पुढे सांगतात, "अदानी समूहाचे अनेक इव्हेंट आम्हाला मिळत आहेत. हल्दीराम, सेलो यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या ओनर्सच्या खासगी इव्हेंटच्या देखील आम्हाला ऑर्डर येत आहेत. यातून आज करोडो रुपयांची कमाई होत आहे."

पान परदेशात पोहचवणार : पुढील काळात नौशाद यांना त्यांचा पानाचा ब्रँड प्रदेशात देखील पोहोचवायचा आहे. 'स्टारबक्स', 'मॅकडॉनल्ड' या परदेशी कंपन्यांचं जाळं ज्याप्रमाणं भारतभर पसरलं, त्याप्रमाणं 'द पान स्टोरी' या ब्रँडचं जाळं देखील परदेशात पौहचलं पाहिजे, अशी नौशाद यांची इच्छा आहे.

हेही वाचा

  1. विदर्भाची खास ओळख 'तान्हा पोळा'! 500 ते 3 लाख रुपयांपर्यंत नंदी बैल विक्रीसाठी उपलब्ध - Nagpur Tanha Pola Festival 2024
  2. ताशा कडाडला, ढोलही घुमला! 'नाशिक ढोल' पथकांचा आवाज देशात घुमणार; परराज्यातही क्रेझ, जाणून घ्या इतिहास - Nashik Dhol
  3. पाववड्याची चव लय न्यारी; गरमागरम देतोय दारोदारी फिरून घरोघरी, शिर्डीच्या पठ्ठ्याची चर्चा - Shirdi Pav Wada Special Story

Last Updated : Sep 2, 2024, 7:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.