नांदेड Independence Day 2024 : भारताचा स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे. त्यानिमित्तानं नांदेड इथल्या खादी ग्रामोद्योग भवन इथं मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज बनवला जातो. हा राष्ट्रध्वज देशातील 16 राज्यात पाठवला जातो. त्यामुळं नांदेडमधील राष्ट्रध्वज निर्मितीला अनन्य साधारण महत्त्व आहे. "खादी हे केवळ कापड नसून तो एक राष्ट्रीय विचार आहे. याच विचारातून खादीपासून तयार केलेला राष्ट्रध्वज देशभरात फडकवला जातोय. नांदेडमध्ये खादीपासून तयार केलेला राष्ट्रध्वज 16 राज्यांमध्ये जातो," अशी माहिती मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी दिली.
महाराष्ट्रात मुंबई आणि नांदेड अशा दोन खादी ग्रामोद्योग मंडळांमध्ये राष्ट्रध्वज तयार करण्यात येतो. याव्यतिरिक्त खादीचा ध्वज राज्यात कुठंही तयार होत नाही. खादीच्या ध्वजांना असलेल्या मागणीनुसार उत्पादन कमी झालं नाही. खादी ग्रामोद्योग मंडळात निर्माण होणारा राष्ट्रध्वज जवळपास 12 राज्यात पाठवला जात असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो." - ईश्वरराव भोसीकर, अध्यक्ष, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती
तयार केले जातात विविध आकारातील राष्ट्रध्वज : खादी ग्रामोद्योग मंडळाकडून हुबळी (कर्नाटक), दिल्ली, मुंबई आणि नांदेड या ठिकाणी राष्ट्रध्वज निर्मिती केली जाते. या ठिकाणाहून तयार झालेले राष्ट्रध्वज देशाच्या विविध राज्यात पाठवले जातात. वरील चार ठिकाणी तयार झालेला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकवला जातो. नांदेडमध्ये विविध आकारातील राष्ट्रध्वज बनवले जातात. सर्वांत मोठा राष्ट्रध्वज 14 बाय 21 फूट आकाराचा असतो. अन्य ध्वज 8 बाय 21 फूट, 6 बाय 9 फूट, 4 बाय 9 फूट, 3 बाय साडेचार फूट, 2 बाय 3 फूट तसेच साडेसहा बाय 9 फूट आकाराचे राष्ट्रध्वज इथं बनवले जातात. मंत्रालयावर दररोज फडकणारा, मंत्र्यांच्या गाडीवर फडकणारा आणि राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी तसेच इतर शासकीय कार्यालयावर फडकणारा राष्ट्रध्वज हा खादी ग्रामोद्योगमध्ये तयार केला जातो.
महाराष्ट्रात मुंबई आणि नांदेडमध्ये बनतो राष्ट्रध्वज : नांदेड इथं ग्रामोद्योग केंद्रात राष्ट्रध्वज तयार करण्याचं काम जोमात सुरू आहे. याबाबत ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष ईश्वरराव भोसीकर यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात मुंबई आणि नांदेड अशा दोन खादी ग्रामोद्योग मंडळांमध्ये राष्ट्रध्वज तयार करण्यात येतो. याव्यतिरिक्त खादीचा ध्वज राज्यात कुठंही तयार होत नाही. खादीच्या ध्वजांना असलेल्या मागणीनुसार उत्पादन कमी झालं नाही. खादी ग्रामोद्योग मंडळात निर्माण होणारा राष्ट्रध्वज जवळपास 12 राज्यात पाठवला जात असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो."
'इतके' कारागीर बनवतात राष्ट्रध्वज : तिरंगा हा राष्ट्रध्वज हा शंभरावर अधिक कारागिरांच्या हातून तयार होतो. नांदेडमधील खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सुमारे 100 च्या वर कारागिरांच्या हातून राष्ट्रध्वज निर्मिती होते. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 1 मे या महत्त्वाच्या दिवसासाठी तिरंगा ध्वज विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. यासाठी राष्ट्रध्वज निर्मितीचं काम वर्षभर सुरू असते. यातूनच खादी ग्रामोद्योग समितीला दरवर्षी आठ ते नऊ कोटीपर्यंत अधिक उत्पन्न मिळते. हरघर तिरंगा उपक्रमामुळे तिरंग्याला प्रचंड मागणी वाढल्यानं राष्ट्रध्वज बनवणं अवघड होऊ लागलं. त्यामुळे सर्वसामान्यांनी खादीचे राष्ट्रध्वज न वापरता टेरिकॉट इतर कापडाचे राष्ट्रध्वज वापरले. त्यामुळे खादी ग्रामोद्योग मंडळाला प्रचंड नुकसान झालं, अशी माहिती सूत्रांनी दिली.
स्वामी रामानंद तीर्थ, पद्मभूषण गोविंद भाई श्राफ यांनी स्थापली संस्था : खादी ग्रामोद्योग मंडळ ही संस्था 1967 मध्ये स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ, पद्मभूषण गोविंद भाई श्राफ यांनी स्थापन केली. शंकरराव चव्हाण यांनी या संस्थेचं पालन पोषण केलं. राष्ट्रध्वज निर्मिती केंद्र नांदेडमध्ये असून यासाठी लागणारे कापड उदगीर इथून कापड आणून राष्ट्रध्वज निर्मिती केली जाते. खादी ग्रामोद्योग केंद्र हे भावी पिढींसाठी प्रेरणा देणारं असल्याची प्रतिक्रिया मराठवाडा क्रांतिकारक उद्योग समितीचे अध्यक्ष ईश्वरराव भोसीकर यांनी दिली.
प्रत्येकानं खादी खरेदी करण्याचं आवाहन : खादी कपड्यांना सध्या सुगीचे दिवस आहेत. मात्र तयार झालेला माल सरकार तयार करत नाही. इतर उद्योगांना देतात तशीच वीज बिल माफी, कर्जमाफी या सवलती खादी ग्रामोद्योग मंडळांना मिळत नाहीत. कामगारांची वेतन भत्ते अत्यंत कमी आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी एक ड्रेस खरेदी करावा, त्यामुळे खादी उद्योगाला चालना मिळेल, असं आवाहन ईश्वरराव भोसीकर यांनी केलं.
हेही वाचा :