ETV Bharat / state

दाऊदचा भाऊ इकबल कासकरची खंडणी प्रकरणातून मुक्तता - Iqbal Kaskar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 8:37 PM IST

Iqbal Kaskar : मोक्का न्यायालयानं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबल कासकरची खंडणी प्रकरणातून निर्दोश मुक्तता केलीय. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत विशेष न्यायालयानं त्याची सुटका केलीय.

Iqbal Kaskar,  Dawood Ibrahim
दाऊद इब्राहिम, इकबल कासकर (File Photo)

ठाणे Iqbal Kaskar : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) विशेष न्यायालयानं बुधवारी फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरची खंडणी प्रकरणातून निर्दोष मुक्तता केलीय. ठाणे पोलिसांनी 2017 मध्ये खंडणी प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमित एम. शेटे यांनी केसकरवरील आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी अयशस्वी ठरल्यानं त्यांची निर्दोष मुक्तता करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं.

इतर आरोपी फरार : कासकरवर ठाणे नगर पोलिस ठाण्यात MCOCA च्या कलम 3 तसंच भारतीय दंड संहितेच्या कलम 384 (खंडणी),386 (मृत्यूची भीती दाखवणे) नुसार गुन्हा दाखल केला होता. सदरचं प्रकरण विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश अमित एम. शेटे यांच्या न्यायल्यात सुरू होतं. मुंबईच्या गोराई परिसरातील 38 एकर जागेच्या सौदयात 3 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाकडं गुन्हा दाखल झाला होता. सादर प्रकरणावर सुनावणी सुरू असताना आरोपी इक्बाल कासकरच्या वकीलानं सांगितलं इक्बाल कासकर अनेक प्रकरणांमध्ये तुरुंगात आहे. विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित शेट यांनी त्याची निर्दोष मुक्तता केलीय. उर्वरित आरोपी दाऊद इब्राहिम, अनीस इब्राहिम हे अद्याप फरारी आहेत.

कासकरची निर्दोष सुटका : गेल्या वर्षी कासकरच्या जामीन अर्जाला विरोध करताना, फिर्यादी पक्षानं म्हटलं होतं की, पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिमच्या मदतीनं कासकरनं वेगवेगळ्या बिल्डर, चित्रपट निर्माते, उद्योगपतींना फोन करून पैसे उकळले आहेत. जीवाच्या भीतीनं त्याच्याविरोधात कोणीही पोलिसांसमोर तक्रार करण्यासाठी येत नाहीय. सरकारी पक्ष तसंच बचाव पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीश अमित शेट यांनी कासकरवरील आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरलाय. त्यामुळं त्याची निर्दोष मुक्तता केली पाहिजे," अशी टिप्पणी केली. त्यानंतर खंडणी प्रकरणातून इक्बाल कासकरची निर्दोष सुटका केल्याचा निकाल दिल्याची माहिती कासकरचे वकील पुनित माहीमकर यांनी दिली.

'हे' वाचलंत का :

  1. शीना बोरा हत्याकांडातील महत्त्वपूर्ण हाडे मिळत नसल्याची सीबीआयची न्यायालयाला माहिती - Maharashtra Live updates
  2. बलात्कार पीडितेची आत्महत्या: गावातीलच नराधमानं अत्याचार केल्याच्या धक्क्यातून पीडितेनं घेतलं जाळून - Rape Victim Dies By Suicide
  3. अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राविरोधात तपास करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे पोलिसांना आदेश, नेमकं प्रकरण काय? - Shilpa Shetty

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.