ETV Bharat / state

बारवी नदीत बुडून तिघांचा मृत्यू; बुडत्या मित्राला वाचवायला गेला अन्... - Thane News - THANE NEWS

Three Youth Drowing Barvi River : बदलापूर जवळील अस्नोली गावाजवळून वाहणाऱ्या बारवी नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (1 मे) घडली. याप्रकरणी कुळगाव-बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Thane News three youth died after drowning in Barvi river Badlapur
बारवी नदीत बुडून तिघांचा मृत्यू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 3:30 PM IST

ठाणे Three Youth Drowing Barvi River : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर जवळील अस्नोली गावाजवळून वाहणाऱ्या बारवी नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. याप्रकरणी कुळगाव-बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हृतिकेश मुरगु ( वय 23), सुहास कांबळे (वय 19), युवराज हुली (वय 18) असं मृत तरुणांची नावं असून तिघंही अंबरनाथ शहारतील रहिवासी होते.

एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघंही बुडाले : मिळालेल्या माहितीनुसार, मृतक हृतिकेश, सुहास, युवराज हे तिघं मित्र अंबरनाथ शहरातील घाडगेनगर तसंच जावसई परिसरात राहणारे होते. हे तिघंही आपल्या काही मित्रांसह 1 मे ला दुपारच्या सुमारास बदलापूर जवळील अस्नोली गावाजवळील बारवी नदीत पोहोण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळं एक मित्र बुडू लागला म्हणून त्याला वाचवण्यासाठी दुसरा मित्र गेला. दोघांनाही बुडताना पाहून तिसरा त्यांना वाचवण्यासाठी गेला. पण एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघंही नदीमध्ये बुडाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कुळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचाही नदी पात्रात शोध सुरू केला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास तिघांचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीनं आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेहांना बदलापूर ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्यांच्या मृत्यूमुळं घाडगेनगर आणि जावसई परिसरात शोककळा पसरली आहे. तसंच, या तिन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

हेही वाचा -

  1. कर्ज काढून घेतली दुचाकी ; फायनान्स कंपनी कर्मचाऱ्यांच्या मारहाणीतून सुटला अन् तलावात पडून तरुणानं गमावला जीव - Youth Died In Pond
  2. पोहण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा कालव्यात बुडून मृत्यू - Satara Crime News
  3. सुट्टीच्या काळात मुलांवर ठेवा लक्ष! फिरायला गेलेल्या दोन शाळकरी मुलींचा धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू - SATARA DROWN NEWs

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.