ETV Bharat / state

चॉकलेटचे आमिष दाखवून शेजाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला अटक - अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Thane crime चॉकलेटच्या बहाण्यानं 10 वर्षीय अल्पवयीन पीडितेला घरात नेऊन एका नराधमानं तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडंच ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली गेली.

Neighbor tried to molest minor girl
शेजाऱ्याकडून अत्याचार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 9:13 PM IST

ठाणे Thane crime : "घरात पूजा असून तुला चॉकलेट देतो. तू माझ्या घरात चल," असं बोलून शेजारी राहणाऱ्या ४२ वर्षीय नराधमानं एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजार धर्माला काळिमा फासणारी ही घटना कल्याण पूर्वेतील एका सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात ४२ वर्षीय आरोपीवर पोक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पीडितेच्या आईनं दिली तक्रार: पोलीस सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, १० वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी एका इंग्रजी शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर ४२ वर्षीय नराधम हा पीडिता राहत असेलल्या सोसायटीमधील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतो. त्यातच १५ फेब्रुवारी रोजी शाळेला सुट्टी असल्यानं पीडित मुलगी आपल्या बहिणी आणि मैत्रिणी सोबत दुपारच्या सुमारास सोसायटीच्या आवारात खेळत होती. तर आरोपीच्या घरात त्याच दिवशी पूजा असल्याचं पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीत नमूद केलं.

चॉकलेटच्या बहाण्यानं नेले बेडरूममध्ये: १५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास पीडित मुलीला नराधम शेजाऱ्याने तिच्या सोबत खेळणाऱ्या ४ ते ५ मैत्रिणींना घरात पूजा ठेवली असून तुम्ही सर्वजण माझ्या घरी पूजेमध्ये या असं सांगितलं. तर पीडित मुलीला तुला चॉकलेट देतो, असं आमिष नराधमानं दाखवून तिला तो त्याच्या घरात घेऊन गेला. घरात सर्व मुलांना जेवण दिल्यानंतर मुलं आपआपल्या घरी गेली. अशातच नराधमानं पीडित मुलीला नराधम चॉकलेटच्या बहाण्यानं बेडरूममध्ये घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करत पीडितेला कापून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणामुळे पीडित मुलगी भयभीत झाली होती.

गुन्हा दाखल करून आरोपीला अटक: घडलेल्या प्रकारामुळे पीडित मुलगी रडत असल्याचं पाहून आईने तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यामुळे तिला धक्काच बसला. या घटनेनंतर पीडित मुलीला घेऊन आईनं मानपाडा पोलीस ठाणे गाठून ४२ वर्षीय नराधमावर भादंवि कलम ३५४, ५०६, सह पोस्को कलम ४, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या आधारे आरोपीला अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास मानपाडा पोलीस पथक करीत आहेत.

हेही वाचा:

  1. अश्लील फोटो पसरवण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर बलात्कार; गुन्हा दाखल होताच आरोपीची आत्महत्या
  2. अल्पवयीन मुलींना धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचार; आरोपीला 48 तासात केली अटक
  3. दोन अल्पवयीन मुलींवर प्रार्थनास्थळात बलात्कार; चॉकलेटचं आमिष दाखवून केला अत्याचार, आरोपींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.