ETV Bharat / state

धक्कादायक ! बापानंच 8 वर्षाच्या मुलाच्या तोंडात कागदाचा बोळा कोंबून मारलं ठार; कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का - Crime News - CRIME NEWS

Thane Crime News : नवरा बायकोच्या भांडणात बापानंच आपल्या 8 वर्षाच्या मुलाला तोंडात बोळा कोंबून ठार मारल्याची घटना ठाण्यातील शहापूर तालुक्यात समोर आलीय. याप्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आलीय.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 4:33 PM IST

ठाणे Thane Crime News : नवरा बायकोच्या भांडणाचा राग आपल्याच पोटच्या 8 वर्षाच्या मुलावर काढून जन्मदात्या बापानेच त्याच्या तोंडात कागदाचा बोळा कोंबून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. कौटुंबिक हिंसाचाराची ही धक्कादायक घटना शहापूर तालुक्यातील वाशाळा खुर्द गावात घडलीय. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपी बापाला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. एकनाथ नामदेव गायकवाड (59) असं अटक केलेल्या बापाचं नाव आहे.

पती-पत्नीमध्ये वाद : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाप एकनाथ हा पत्नी आणि दोन मुलांसह शहापूर तालुक्यातील वाशाळा खुर्द गावात राहतो. त्यातच गेल्या चार महिन्यांपासून आरोपी एकनाथ आणि त्याची बायको छाया या दोघांमध्ये कौटुंबिक वाद झाले होते. त्यामुळं या वादाला कंटाळून आरोपीची बायको तिच्या माहेरी इगतपुरी तालुक्यातील खंबाळा इथं राहण्यास गेली होती. त्यातच दीड महिन्यापूर्वी आरोपीची बायको मुलांना घेऊन जाण्यसाठी आरोपीच्या घरी अली असता, तिला आरोपी नवऱ्यानं मुलांना घेऊन जाण्यास विरोध केला. त्यामुळं मुलांची आई पुन्हा माहेरी निघून गेली होती.

बेपत्ता झालेला मुलगा आढळला मृतावस्थेत : दरम्यान 10 जून रोजी दुपारच्या सुमारास मृत 8 वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाल्यानं त्याचा नातेवाईकांनी त्याचा शोध सुरु केला. तर दुसरीकडे तो आईकडे इगतपुरी तालुक्यातील खंबाळा गावात गेला असावा असा संशय नातेवाईकांना आला त्यामुळं त्याच्या आईकडेही संपर्क साधून त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर तो इकडे आला नसल्याचं त्याच्या आईनं सांगितलं. त्यामुळं परिसरात आणि आजूबाजूच्या गावात शोध घेतला. मात्र 8 वर्षाय मुलगा कुठंही आढळून आला नव्हता. दुसऱ्या दिवशी शोध घेत असतानाच आरोपीच्या घरापासून 150 मीटरच्या अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी त्याच्या तोंडात कागदाचा बोळा कोंबलेला अवस्थेत असल्याचं दिसून आलं.

आरोपी बापाला अटक : या घटनेची माहिती कसारा पोलीस पथकाला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मुलाचा मृतदेह शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरणीय तसपाणीसाठी रवाना केला. त्यानंतर गावातील पोलीस पाटील पंढरी नामदेव गायकवाड यांच्या तक्रारीवरुन 11 जून रोजी अज्ञात व्यक्ती विरोधात कसारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला. पोलीस तपासात मृताचा बाप योग्य मदत करत नसल्याचा संशय आल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी एकनाथनं मुलाच्या हत्येची कबुली देत, घटनेच्या दिवशी मुलानं बापाला शिवीगाळ केल्यानं बापानं मुलाची हत्या केल्याची कबुली दिल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. पत्नी पत्नीच्या भांडणात पाच महिन्याच्या चिमुकलीचा बळी; निर्दयी बापानं पोटच्या मुलीला आपटलं जमिनीवर - Crime News
  2. अभिनेत्री मलाबिकाच्या पार्थिवावर ममदानी ट्रस्टनं केले अंत्यसंस्कार, मृत्यूचे नेमके कारण काय? - Actress Noor Malabika Death

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.