मिरा भाईंदर Thane Crime News : मिरा भाईंदरमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांच्याकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. मिरारोडच्या नयानगर आणि बेवर्ली पार्क परिसरात पाच बांगलादेशी महिला बेकायदेशीर वास्तव्य करत होत्या. या महिलांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आलीय.
गुन्हा दाखल : मिरारोडच्या नयानगर आणि बेवर्ली पार्क परिसरात काही झोपडपट्टीचा भाग आहे. येथे काही बांगलादेशी नागरिक पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता नया नगर भागात तीन तर बेवर्ली पार्क परिसरात दोन अशा पाच महिला आढळल्या. त्यांची चौकशी केली असता त्या मूळच्या बांगलादेशी असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच त्या भारतात आल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात तीन आणि मिरारोड पोलीस ठाण्यात दोन जणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, पोलीस निरीक्षक समीर अहिरराव आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष या टीमनं केली आहे.
मिरा भाईंदर शहरात पाच बांगलादेशी आढळून आल्या आहेत. कायदेशीर कारवाई करण्यात आली असून ही कारवाई पुढं देखील सुरू राहणार आहे - अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा)
मिरा भाईंदर शहरातील अनेक भागात बांगलादेशी राहात असल्याची माहिती होती. तरी पोलीस प्रशासन याप्रकरणी कारवाई करण्यात दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलं. मात्र, सध्या बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या घटनेमुळं प्रशासनाला जाग आल्याचं बोललं जातय. पोलीस प्रशासनाकडून नियमित तपासणी झाली तर बांगलादेशींची घुसखोरी होणार नाही. मात्र, पोलीस याची काटेकोर अंमलबजावणी करणार का? ही कारवाई पुढं सुरू राहणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा -
- नाशिकमध्ये एटीएसची कारवाई; स्पासह ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या दोन बांगलादेशी घुसखोर महिलांसह तिघांना अटक - bangladeshi nationals arrest
- बनावट कागदपत्रांसह मुंबईत राहणाऱ्या बांगलादेशींना एटीएसकडून अटक; लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचं उघड - Mumbai ATS arrested Bangladeshi
- मुंबईतील अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी, रोहिंग्यांचा बंदोबस्त करणार; 'त्या' घटनेनंतर पालकमंत्री लोढा आक्रमक - Mumbai Crime