ETV Bharat / state

अनाथ आश्रमात रहाणाऱ्या चिमुरडीला दिले चटके, संस्था चालकाला पोलीस कोठडी - little girl tortured - LITTLE GIRL TORTURED

little girl tortured : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर भिवंडीतील अनाथ आश्रमात चिमुरडीला चटके देऊन गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संस्था चालकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

tortured little girl
तीन वर्षाच्या चिमुरडीला दिले चटके (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2024, 10:41 PM IST

ठाणे little girl tortured : बदलापूर पर्व शाळेमधील दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचाराचा देशभर मुद्दा गाजत आहे. यावरून महाराष्ट्रात राजकीय नेत्यांसह नागरिकांनी रस्त्यावर निषेध नोंदवला आहे. त्यामुळं मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

भिवंडी शहरातील एका अनाथ आश्रमात रहाणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुरडीला संस्था चालकानंच चटके दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तीन वर्षाची चिमुरडी या घटनेत जखमी झाली आहे. हा प्रकार भिवंडी शहरातील धामणकर नाका येथील एका अनाथ आश्रमात घडलाय. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आश्रम संचालक दत्ता गायसमुद्रेला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे पालक भिक्षेकरू आहेत. त्यामुळं मुलीच्या आजीनंं तिला तीन महिन्यापूर्वी आरोपी दत्ता गायसमुद्रेच्या अनाथ आश्रमात आणलं होतं. तेव्हापासून ती मुलगी आश्रमातच वास्तव्यास होती. काही दिवसांपूर्वी तिच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या होत्या. त्यामुळं तिच्या आजीनं तिला ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेलं होतं.

आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी : उपचारा दरम्यान तिच्या पोटावर तसंच डाव्या कानाच्या मागे, डाव्या डोळ्याच्या बाजूला चटके दिल्याच्या जखमा असल्याचं स्पष्ट झालं. खळबळजनक बाब म्हणजे पीडित मुलीसोबत ही घटना 23 मे ते 15 जुलै 2024 दरम्यान आश्रमात घडली आहे. याप्रकरणी 22 ऑगस्ट रोजी पीडितेच्या आजीच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), बालन्याय (मुलांच्या काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आज 23 ऑगस्ट रोजी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा अधिक तपास भोईवाडा पोलीस करत आहेत.

'हे' वाचलंत का :

  1. कोल्हापूर हादरलं! बिहारी जोडप्याच्या अल्पवयीन मुलीची हत्या, मामानेच अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा अंदाज - MINOR GIRL MURDER
  2. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : निलंबित पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची मुंबईत बदली, उलट सुलट चर्चांना उधाण - Badlapur Sexual Abuse Case
  3. न्यायालयानं दखल घेतल्यानंतर जबाब नोंदवले; मुंबई उच्च न्यायालयानं पोलीस तपासावर ओढले ताशेरे - Badlapur Sexual Assault Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.