ETV Bharat / state

शोरुम फोडण्यापूर्वी 'भगदाड गँग' काय करायची? पोलिसांना चकवा देण्याकरिता चक्रावून जाणारे कारनामे - Thane Crime News - THANE CRIME NEWS

Thane Crime : मोबाईलसह इलेक्ट्रानिक साहित्य विक्री करणाऱ्या शोरुमच्या भिंतीला भगदाड पाडून शोरुममधील जवळपास 8 लाख 13 हजारांचे मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती. चोरी करून फरार झालेल्या आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय.

Thane Crime
Thane Crime (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 4:38 PM IST

Updated : Aug 11, 2024, 6:57 PM IST

ठाणे Thane Crime : मोबाईलसह इलेक्ट्रानिक साहित्य विक्री करणाऱ्या शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून शोरुममधील 8 लाख 13 हजार रुपयांचे मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती. ही घटना कल्याण-भिवंडी मार्गावरील असलेल्या कोनगावातील घडली होती. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या टोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खळबळजनक बाब म्हणजे 'भगदाड गँग'नं पोलीस पथकाला तपासात चकवा देण्यासाठी प्रवासादरम्यान चार ठिकाणे बदली केली. मात्र, पोलिसांनी या गँगचा माग काढला. 150 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपींनी कसे पकडले? (Source - ETV Bharat Reporter)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल ताराचंद परदेशी (वय 34) यांचं कल्याण-भिवंडी मार्गावर विविध कंपनीचे मोबाईलसह इलेक्ट्रानिक साहित्य विक्रीचं शोरूम आहे. शोरुम मालक नेहमी प्रमाणे 27 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास शोरुम बंद करून गेले. त्यानंतर 28 जुलै रोजीच्या पहाटेच्या सुमारास चार चोरटयांनी शोरुमच्या लगतच पत्र्याचे कंपाऊंड असल्यानं त्याचा आडोसा घेतला. शोरुमच्या भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला. चोरटयांनी शोरुममधून जवळपास 8 लाखांचे विविध कंपनीचे महागडे मोबाईल लंपास केले. शोरुम मालक परदेशी हे 28 जुलै रोजी शोरुम उघडण्यासाठी सकाळच्या सुमारास आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीनं कोनगाव पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई : नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्थानकात उतरून चोरलेला मुद्देमाल एका चोरट्याच्या सानपाडा येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरी ठेवून चारही चोरटे पनवेलमध्ये गेले. ही माहिती 150हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासणी केल्यानंतर समोर आली. पोलीस पथकानं तांत्रिक तपासाच्या आधारे पनवेलमधून इस्माईल नसरुउद्दीन शेख याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता, इतर तीन साथीदार पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये निमगाव भागात असल्याची त्यानं माहिती दिली. पोलीस पथकानं त्या ठिकाणी सापळा रचून तीन चोरट्यांना ताब्यात घेतलं. चोरीला गेलेला 8 लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्करणी चौघांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी दिली.

  • आरोपींची नावं : इस्माईल नसीरुद्दीन शेख (26) , अज्जुल नाजाब शेख (53) मोहमंद नाजीर शेख (44), अब्दूल मजीद हसन शेख उर्फ मुल्ला (वय 40) असं कोनगाव पोलीस पथकानं बेड्या ठोकलेल्या सराईत चोरट्यांची नावं आहे. चौघेही मूळचे झारखंडचे रहिवाशी असल्याची माहिती समोर आली.

गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडीस : खळबळजनक बाब म्हणजे याच शोरुममध्ये 2018 साली 'भगदाड गँग'ने शटर तोडून प्रवेश करत 26 लाखांच्या मोबाईलवर डल्ला मारला होता. त्यावेळी स्थानिक पोलिसांनी आणि भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकानं तपास करून या गँगच्या मुसक्या आवळल्या होत्या. याच शोरुममध्ये भगदाड गँगनं डल्ला मारून लाखोंचे मोबाईल लंपास केले होते. 'चादर गँग'मधील गुन्हेगार शोरुम, ज्वेलर्सच्या अथवा बँक लगतच्या दुकानाला लागून असलेला गाळा भाड्यानं घेतात. त्यामध्ये फळविक्रीचा व्यवसाय दिखाव्यासाठी करायचे. भिंत फोडून लगतच्या दुकानात चोरी करायचे, अशी या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत होती. या चोरट्यांनीही फळविक्री करत असताना शोरुमची रेकी करून चोरी केल्याची कुबली दिली आहे. चारही आरोपी कोनगाव पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्यांनी आणखी काही या पद्धतीने गुन्हे केले आहेत. याचाही तपास पोलीस पथक करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा

  1. ड्रग्ज मिळून आल्याची बतावणी करत डॉक्टर, उद्योजकाला 31 लाखांचा गंडा - Nashik Crime
  2. पुण्यातील नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका? स्वत: पोलीस आयुक्तांनी दिलं पत्र - Terrorist Attack Possibility Pune
  3. कारागृहात दोन बंदीवानांची हाणामारी : मध्यस्थी करणाऱ्या बंदीवानावर धारदार ब्लेडनं वार - Clash In Thane Jail

Last Updated : Aug 11, 2024, 6:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.