ETV Bharat / state

बांगलादेशी पॉर्नस्टार अटकेत ; बनावट कागदपत्रावर राहत होती उल्हासनगरात, कुटुंबाचा समावेश असल्याचा संशय - Bangladeshi Porn Star Arrested

Bangladeshi Porn Star Arrested : बांगलादेशी पॉर्नस्टार बेकायदेशीर उल्हासनगरात राहत असल्याचं उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली. या पॉर्नस्टारला हिल लाईन पोलीस ठाण्यातील जवानांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोही बरदे उर्फ बन्ना शेख असं अटक केलेल्या पॉर्नस्टारचं नाव आहे.

Bangladeshi Porn Star Arrested
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 2:08 PM IST

ठाणे Bangladeshi Porn Star Arrested : बांगलादेशी पॉर्नस्टारला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यानं मोठी खळबळ उडाली. बनावट कागदपत्रावर ही बांगलादेशी पॉर्नस्टार उल्हासनगरात राहत होती. विशेष म्हणजे या पॉर्नस्टारनं भारतातील रहिवाशी प्रमाणपत्र बनवून त्याच्या आधारे आपला पारपत्रही बनवल्याचं उघड झालं. आरोही बरदे उर्फ बन्ना शेख असं अटक केलेल्या पॉर्नस्टारचं नाव आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक संग्राम मालकर यांनी दिली.

बांगलादेशी महिला उल्हासनगरात बेकायदेशीर राहत असल्याची तक्रार हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी आम्ही तपास केला असता, या महिलेनं सादर केलेले कागदपत्र बनावट असल्याचं तपासात उघड झालं. त्यामुळे या महिलेला अटक करण्यात आलं आहे. पुढील तपास सुरू आहे. - संग्राम मालकर, पोलीस उपनिरीक्षक, हिल लाईन पोलीस ठाणे

बांगलादेशी पॉर्नस्टार अटकेत : बांगलादेशी पॉर्नस्टार असलेली आरोही बरदे उर्फ बन्ना शेख ही भारतीय वंशाची नसून ती बांगलादेशी असल्याची तक्रार एका तक्रारदारानं हिल लाईन पोलीस ठाण्यात केली होती. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक संग्राम मालकर यांच्या पथकानं या पॉर्नस्टार असलेल्या आरोही बरदे उर्फ बन्ना शेख हिची कसून चौकशी केली. यावेळी संशयित आरोही बरदे उर्फ बन्ना शेख हिच्याकडं पोलिसांनी तिच्या भारतीय असल्याबाबतच्या कागदपत्रांची चौकशी केली. यावेळी संशयित आरोही बरदे उर्फ बन्ना शेख हिनं तिच्या रहिवास प्रमाणपत्रासह विविध कागदपत्र तपासणी पथकाकडं सादर केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संग्राम मालकर यांच्या पथकानं या कागदपत्राची कसून तपासणी केली. यावेळी ही कागदपत्र बनावट असल्याचं त्यांच्या तपासणीत उघडकीस आलं. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक संग्राम मालकर यांच्या पथकानं पॉर्नस्टार आरोही बरदे उर्फ बन्ना शेख हिला बेड्या ठोकल्या आहेत.

अनेक वर्षापासून भारतात वास्तव्य : बांगलादेशी पॉर्नस्टार असलेली आरोही बरदे उर्फ बन्ना शेख ही मागील अनेक वर्षापासून भारतात वास्तव्य करत आहे. तिनं अनेक दुय्यम दर्जाच्या चित्रपटात अभिनय केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे तिचे आई वडीलही तिच्यासोबत उल्हासनगरात राहत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोही बरदे उर्फ बन्ना शेख हिच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

नाव बदलून राहत होते उल्हासनगरात : बांगलादेशी पॉर्नस्टार आरोही बरदे उर्फ बन्ना शेख ही उल्हासनगरात बेकायदेशीर राहत असल्याचं तपासात उघड झालं आहे. त्यामुळे पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करुन तिला बेड्या ठोकल्या आहेत. आरोही बरदे उर्फ बन्ना शेख ही नाव बदलून राहत असल्याचं स्पष्ट झालं आहे. तिच्यासह तिच्या कुटुंबीयांनीही आपली नावं बदलून उल्हासनगरात बस्तान मांडल्याचं उघड झालं आहे. आरोही बरदे उर्फ बन्ना शेख हिच्यासह तिची आई अंजली राजाराम पाटील उर्फ अंजली अरविंद बरदे उर्फ रुबी शेख, भाऊ रवींद्र अरविंद बरदे उर्फ रियाज शेख, रितू अरविंद बरदे उर्फ मोनी शेख, वडील अरविंद शामराव बरदे आदी राहत असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. महिला प्रतिष्ठेच्या गप्पा मारणाऱ्या कंगना रणौतनं उर्मिला मातोंडकरला 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हणत केली होती हेटाळणी - Kangana Ranaut
  2. B'dya Spl: अॅडल्ड इंडस्ट्रीत येण्याआधी सनी करायची बेकरीत काम, बनायचं होतं नर्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.