ETV Bharat / state

ट्रायल रूममध्ये कपडे बदलत असताना तरुणीला गुपचूप पाहत होता टेलर; नंतर झालं असं काही...

खरं तर तरुणीला कपडे बदलनाता पाहिल्यानं टेलरवर विनयभंगाचा आरोप करण्यात आला असून, उपस्थित जमावाने टेलरला पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच बेदम मारहाण केली.

Taylor was secretly watching the young woman
तरुणीला गुपचूप पाहत होता टेलर (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 17 hours ago

ठाणे - ट्रायल रूममध्ये कपडे बदलत असताना तरुणीला गुपचूप पाहणाऱ्या टेलरला जमावाकडून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीय. उल्हासनगर कॅम्प तीनमधील रेल्वे स्टेशन परिसरात दुकानात ही घटना उघडकीस आलीय. खरं तर तरुणीला कपडे बदलनाता पाहिल्यानं टेलरवर विनयभंगाचा आरोप करण्यात आला असून, उपस्थित जमावाने टेलरला पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच बेदम मारहाण केली. यावेळी पोलीस पथकालाही धक्काबुक्की करणाऱ्या जमावाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

...अन् तिच्या कुटुंबाला जाब विचारण्यासाठी टेलरचे दुकान गाठले : मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये आयकॉनिक अल्टरेशनचे दुकान आहे. या दुकानात एक तरुणी अल्टरेशनला दिलेली जीन्स घ्यायला सोमवारी दुपारी चारच्या सुमारास गेली होती. ही पीडित तरुणी चेंजिंग रूममध्ये जीन्स ट्रायल करत असताना टेलरने बघितल्याचा तरुणीचा आरोप आहे. त्यानंतर विनयभंग झालेली तरुणी बाजूलाच असलेल्या के. पी. कलेक्शन या दुकानात आली आणि घडलेला प्रसंग दुकानदाराला सांगितला. तिथे खरेदी करायला आलेल्या पीडित तरुणीने आणि तिच्या कुटुंबाला जाब विचारण्यासाठी टेलरचे दुकान गाठले. त्यावेळी तिथे वाद होऊन पीडितेच्या कुटुंबीयांनी दुकानदाराला रस्त्यावर ओढून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना माहिती पडताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी पोहोचले. मात्र जमावाने त्या दुकानदाराला मारहाण करत मध्यस्थी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय.

जखमी टेलर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल : घटनास्थळी असलेल्या दोन्ही पोलिसांनी जमावापासून टेलरला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रक्षोभक झालेल्या जमावाने पोलिसांनाही जुमानले नाही. अखेर अतिरिक्त पोलीस बल आल्यानंतर जखमी टेलरला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी मध्यवर्ती पोलिसांनी पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनाही ताब्यात घेतलंय. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा टेलरवर दाखल केलाय. तर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या जमावावरही मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस पथक करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलीय.

हेही वाचा

  1. निर्मला सीतारामण अन् विजय रुपाणी भाजपाचे पक्ष निरीक्षक; चार डिसेंबरला विधिमंडळ पक्षाची बैठक
  2. शपथविधीच्या सोहळ्याची तयारी कशी आहे? प्रथमच महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणं केली पाहणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.