ETV Bharat / state

तलाठ्याची ग्रामस्थांसोबत अरेरावीची भाषा, माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणीदरम्यान घडला प्रकार - Talathi argued with villagers

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 9:36 PM IST

Updated : Jul 4, 2024, 11:06 PM IST

महाराष्ट्रातील महिलांसह मुलींना स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, ग्रामीण भागात तलाठी ग्रामस्थांसोबत अरेरावीची भाषा करत असल्याचं दिसून आलं आहे.

Majhi Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेबाबत जिल्हाधिकाऱ्याची बैठक (Etv Bharat Reporter)

बुलडाणा : राज्य शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याकरता प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुख्यतः ग्रामीण भागात प्रशासनाकडून नागरिकांनासोबत अरेरावीच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामुळं योजना राबवताना सर्वसामान्य गरजू लोकांशी वागण्याचे वर्ग घेण्याची पाळी आता प्रशासनावर आली आहे.

तलाठ्याची ग्रामस्थांसोबत अरेरावीची तसंच जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया (Etv Bharat Reporter)

अरेरावीचा व्हिडिओ वायरल : अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळं अर्ज भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिला तलाठी कार्यालयावर गर्दी करताना दिसत आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथील तलाठी कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी महिला आली, त्यावेळी ग्रामस्थांनी तलाठ्यांना तुम्ही गावात का येत नाही, असा जाब विचारला. त्यावर, तलाठी काळे यांनी ग्रामस्थांना अरेरावीची भाषा वापरली. तसंच महिलांचे अर्ज घेणं त्यांनी बंद केलं. "माझी तक्रार कुठेही करा, आमदार, खासदारसह तहसीलदारांना सांगा. मी तुमचे अर्ज घेणार नाही" असं म्हणत तलाठी काळे तिथून निघून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

तलाठ्यांना समन्स : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेसाठी लाभार्थी महिलांचे वय 21 ते 65 वर्ष करण्यात आलं आहे. त्यामुळं कागदपत्रांची जुळवा जुळव करण्यासाठी महिलांची गर्दी होताना दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा या ठिकाणी तलाठ्यानं ग्रामस्थांसोबत अरेरावीची भाषा वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यांना समन्स दिलं आहे. तसंच तलाठ्याकडं दोन गावचा चार्ज असल्यामुळं अर्ज देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलीय. त्यामुळं सदरील प्रकार घडला आहे, अशी माहिती बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

'हे' वाचलंत का :

  1. जातनिहाय जनगणना केल्यास प्रश्न सुटणार : खासदार अमोल कोल्हेंचं आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य - Maratha reservation
  2. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला 5 पैशांची किंमत नाही का? गणेश नाईक यांचा सरकारला घरचा आहेर - Ganesh Naik On Cidco
  3. ...तर माझ्यावर हक्कभंग आणा; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना आव्हान - Devendra Fadnavis News

Last Updated : Jul 4, 2024, 11:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.