ETV Bharat / state

छगन भुजबळांच्या फार्म हाऊसची ड्रोनद्वारे रेकी केल्याचा संशय, पोलीस बंदोबस्तात वाढ - Chhagan Bhujbal Nashik Farm - CHHAGAN BHUJBAL NASHIK FARM

Bhujbal Farm Drone Reki : मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील फार्म हाऊसची ड्रोन कॅमऱ्याद्वारे अज्ञात व्यक्तीकडून रेकी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे भुजबळ फार्मवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी याविषयी माहिती दिली.

Bhujbal Farm Drone Reki
छगन भुजबळांच्या फार्मची ड्रोनद्वारे रेकी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 9:01 PM IST

नाशिक Bhujbal Farm Drone Reki : राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्मवर शुक्रवारी 5 एप्रिल रोजी रात्री सव्वासात ते साडेसात वाजेच्या सुमारास ड्रोन कॅमेरा फिरल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने या भागाची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात असून भुजबळ फार्मवर बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली.

Chhagan Bhujbal Nashik Farm
Chhagan Bhujbal Nashik Farm

पोलिसांनी घटनास्थळी दिली भेट : मिळालेल्या माहितीनुसार, भुजबळ फार्म येथील सुरक्षा अधिकारी दीपक मस्के यांनी अंबड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. यात मंत्री छगन भुजबळ यांचे नाशिक येथील निवासस्थान असलेले भुजबळ फार्म येथे शुक्रवारी रात्री सव्वासात ते साडेसात वाजेच्या दरम्यान ड्रोन कॅमेरा फिरताना दिसला. या ड्रोन कॅमेऱ्याच्या साहय्याने भुजबळ फार्मची रेकी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणा नंतर तातडीनं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिखर देशमुख यांनी भुजबळ फार्म येथे भेट देऊन माहिती घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना चौकशीचे आदेश दिले. तसंच तक्रार अर्जानंतर भुजबळ फार्मवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली.

धमकीचे आले होते पत्र : फेब्रुवारी 2024 मध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात एक पत्र आलं होतं. त्यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती या पत्रात होती. या पत्रात म्हटलं आहे की, साहेब तुम्हाला उडवण्याची सुपारी पाच लोकांनी घेतली आहे. ते गंगापूर-दिंडोरी-चांदशी इथं हॉटेलमध्ये थांबले आहेत. या लोकांनी तुम्हाला उडवण्याची 50 लाखांची सुपारी घेतली आहे. या गुंडांपासून तुम्ही सावध राहा. ते ५ जण तुमचा रात्रभर शोध घेत फिरत आहेत. सागर हॉटेलसमोर यांची मिटिंग झाली आहे, असा मजकूर या पत्रात लिहिलेला होता. तसंच यात काही वाहनांचे नंबर देखील देण्यात आले होते.

हेही वाचा :

  1. शरद पवार आजचे शिवाजी! आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ; पुरुषोत्तम खेडेकर गरजले - Sharad Pawar
  2. स्वतःच्या ताटात वाढून घेणं ही शिवसेनेची पद्धत नाही, फडणवीसांना श्रीकांत शिंदेंची उमेदवारी घोषित केल्यावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024
  3. वंचितकडून उमेदवार बदलण्याचा धडाका सुरूच! प्रकाश आंबेडकर यांनी 'या' मतदारसंघातील नेत्याची उमेदवारी केली रद्द - LOK SABHA ELECTION 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.