ETV Bharat / state

राजकीय दबावामुळे मुलाला जामीन मिळाला, अन् प्रश्न...; सुप्रिया सुळेंचा नितेश राणेंवर पलटवार - Supriya Sule Criticized Nitesh Rane

Supriya Sule Criticized Nitesh Rane : प्रत्येक गोष्टीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा संदर्भात बोलणाऱ्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील अपघात प्रकरणावर गप्पा का? म्हणत भाजपा आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी भाजपावर पलटवार केला आहे. सत्तेत तेच असलेले ज्यांच्याकडे संबंधित विभागाचे खाते, ज्यांच्या राजकीय दबावामुळे एका मुलाला बेल मिळाली आहे, पण ते मला प्रश्न विचारत आहे. मी विरोधी पक्षात आहे हा अतिशय बालिशपणा असल्याचंही त्या म्हणाल्या.

Supriya Sule Criticized Nitesh Rane
सुप्रिया सुळेंचा नितेश राणेंवर पलटवार (REporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 8:40 PM IST

मुंबई Supriya Sule Criticized Nitesh Rane : पुण्यातील हीट अँड रन प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि नेत्या सुप्रिया सुळे बोलत नसल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेतून केला. यावर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन नितेश राणे यांच्या आरोपाचं खंडन केलं आहे. काल टीव्ही नाही पहिला का, काल मी बारामतीत होते असा टोला देखील त्यांनी भाजपाला लगावला आहे.

पालकमंत्र्यांसोबत भेट नाही : पुण्यातील अपघाता संदर्भात पुण्याचे पालकमंत्री एक शब्दही बोलायला तयार नाही. प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, खरंतर माझी आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची अनेक दिवसांपासून भेट झाली नाही. अनेक प्रश्न आहेत, काल इंदापूरमध्ये घडलेली दुर्घटना असेल, दुष्काळाची महाराष्ट्रातील परिस्थिती असेल, बारामती मतदारसंघातील टँकर आणि अतिवृष्टी झालेल्या भागातील प्रश्न असतील याचा पाठपुरावा मी महाराष्ट्रातील सरकारकडे ट्विटच्या माध्यमातून करीत असून पत्राद्वारे देखील केला असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पालकमंत्र्यांच्या संदर्भात असलेले हे प्रश्न मला विचारण्यापेक्षा आपण काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते, त्यांना विचारायला हवा होता असेही त्या म्हणाल्या आहे.

त्याचे आयकार्ड तपासले नाही का? : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, पोलिसांनी राजकीय दबावात येऊ नये; पण राजकीय दबाव कोण टाकत आहे? कोणी फोन केला? कोणामुळं बेल मिळाली? हे समोर यायला हवे राजकीय दबाव सत्ताधारी करू शकतात, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ३०० शब्दात निबंध लिहा ही चेष्टा असून यातून असंवेदनशील सरकार असल्याचे स्पष्ट होत आहे. रोड सेफ्टी बद्दल कोणीच बोलत नाही. यावर अनेक वेळा मी संसदेत विषय मांडला आहे. माझा आरोप आहे हा मोठा गुन्हा आहे ज्यांनी फ़ोन केला असेल ते ही समोर आले पाहिजे. जे आमदार गेले होते ह्याचे उत्तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. म्हणजे अल्कोहोल रिपोर्ट येण्यासंदर्भात सरकारचा संवेदनशील आणि हलकटपणा समोर आला आहे. अनेक आस्थापनामध्ये प्रवेशकर्त्या वेळी आय कार्ड तपासली जातात. त्यामुळे बारमध्ये जाणाऱ्या सतरा वर्षांच्या मुलाला प्रवेश दिलाच कसा, त्याचे आयकार्ड तपासले नाही का? १७ वर्षांच्या मुलाला दारू देता कशी, गाडीची चावी देता कशी, कोणी फोन केला ह्याचे उत्तर द्यायला हवे. देवेंद्र फडणवीस यांना मुंबईहून पुण्याला का यावं लागलं याचं उत्तर द्यावं लागेल असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुलाला बेल राजकीय दबावामुळे? : राज्यातील कायदा सुव्यवस्था वरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे वारंवार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागताना दिसत होत्या; मात्र या प्रकरणावर राजीनामा मागणार का, यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्तेत तेच असलेले ज्यांच्याकडे संबंधित विभागाचे खाते, ज्यांच्या राजकीय दबावामुळे एका मुलाला बेल मिळाली आहे ते मला प्रश्न विचारत आहे. मी विरोधी पक्षात आहे हा अतिशय बालिशपणा असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्याला बेल मिळालीच कशी? शिक्षा झालीच पाहिजेत. पोलिसांनी राजकीय दबावाखाली दबले जाऊ नका, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राजकीय दबाव कोणी टाकला याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून त्यांनी दिलं पाहिजे, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

हेही वाचा :

  1. महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प परराज्यात, अंबादास दानवेंकडून सरकारवर आरोप - Ambadas Danve
  2. डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट; चार ठार, मृतांचा आकडा वाढण्याची भीती - Dombivli MIDC Blast
  3. मुंबईतील मतदानाची टक्केवारी घटण्यास जबाबदार कोण?; भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा सवाल - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.