ETV Bharat / state

वाघनखांचा वाद: छत्रपती शिवरायांच्या वाघनखांबाबत संशय व्यक्त करणं चुकीचं - सुधीर मुनगंटीवार - Sudhir Mungantiwar On Waghnakh - SUDHIR MUNGANTIWAR ON WAGHNAKH

Sudhir Mungantiwar On Waghnakh : इंग्लंडच्या व्हिक्टर अँड अल्बर्ट संग्रहालयात (Victoria and Albert Museum) असलेली वाघनाखं (Waghnakh) ही छत्रपती शिवरायांचीच असल्याबाबत इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत (Indrajeet Sawant) यांनी संशय व्यक्त केला होता. तसेच यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. सावंत यांच्या आरोपांना सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत उत्तर दिलंय. तसंच शिवरायांच्या वाघनखांबाबत शंका उपस्थित करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Sudhir Mungantiwar On Waghnakh
सुधीर मुनगंटीवार आणि वाघनखं (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 6:01 PM IST

मुंबई Sudhir Mungantiwar On Waghnakh : छत्रपती शिवरायांची इंग्लंडच्या व्हिक्टर अँड अल्बर्ट (Victoria and Albert Museum) संग्रहालयात असलेल्या वाघनखांच्या सत्यतेबाबत इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत (Indrajeet Sawant) यांनी शंका उपस्थित केल्यानंतर, राज्यात या संदर्भात संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. या संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी याबाबत खुलासा केलाय.

शिवभक्तांनी वाघनखांविषयी केली मागणी : या संदर्भात बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या वाघनखांबाबत शिवभक्तांनी वारंवार मागणी केली होती. काहींनी पुरावे, निकाल, जुनी वर्तमानपत्राची कात्रणे दिली, तर काही लोकांनी या म्यूझियममध्ये असणाऱ्या वाघनखांच्या संदर्भातली माहिती देखील त्या म्यूझियमच्यामध्ये असणाऱ्या वेबसाईटवरून आणि त्या ठिकाणच्या फोटोवरून उपलब्ध केली. हे उपलब्ध केल्यावर आपण त्याच्या संदर्भातला पत्र व्यवहार सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ही महाराष्ट्राच्या शिवभक्तांना दर्शनासाठी उपलब्ध करावीत, अशी मागणी पत्रातून केली.

केंद्रीय स्तरावर ब्रिटनशी पत्रव्यवहार : याबाबत पंतप्रधानांनी पत्रव्यवहार केला. ब्रिटनच्या प्रधानमंत्री यांना पंतप्रधान मोदी यांनी पत्रव्यवहार केला. तसंच आपण म्यूझियमच्या प्रमुखांशी संपर्क केला आणि एक दिवस त्यांचं उत्तर आलं. उत्तरासोबतच 1825 मध्ये जी डबी बनवली होती त्या डबीच्या चित्रासहित त्यांनी इतर सर्व माहिती पाठवल्याची माहिती, मुनगंटीवार यांनी दिली.

१९ जुलैला वाघनखं साताऱ्याच्या संग्रहालयात : पहिल्यांदा एक वर्षासाठी ही वाघनखं दर्शनासाठी देऊ, असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आपण पुन्हा प्रयत्न केला. तीन वर्ष ही वाघनखं आपल्याकडं राहील असाही निर्णय करण्यात आला. हा निर्णय केल्यानंतर 19 जुलैला ही वाघनखं साताऱ्याच्या सरकारी म्यूझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि त्या ठिकाणी असणारे सरकार यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना या माध्यमातून पाहता येणार आहेत. एका गोष्टीचा निश्चितपणे आनंद आहे की, हजारो इतिहासकार आहेत जे संशोधक आहेत. त्यापैकी फक्त एका संशोधकानं याबद्दल प्रश्न उपस्थित केला. याचा आनंदही आहे की, या संवेदनशील विषयांमध्ये विरोधी पक्षाच्या 99 टक्के नेत्यांनी काहीही प्रतिक्रिया न देता समजून घेतलं, असंही मुनगंटीवार म्हणाले.

वाघनखांचे भाडे नाही : वाघनखं आणण्यासाठी एक नवीन पैशाचं भाडं हे कधीही दिलं नाही आणि कोणीही मागितलं नाही. एक रुपयाचं भाडं दिलं जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं. वाघनखं आणण्यासाठी खर्च झाला, असा आरोप करण्यात येतो आहे. पण हे आणण्यासाठी कोणतेही करोडो रुपये खर्च झाले नाहीत. फक्त जाणे-येणे, करार करणे याच्यासाठी 14 लाख 8000 रुपयाचा खर्च झाला. सात कोटी रुपये खर्च केले जातायत हेही असत्य आहे. कारण यासाठी कोणताही खर्च केलेला नाही. या वाघनखासोबत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर सर्व शस्त्रांचे यानिमित्ताने जे प्रदर्शन करतो आहे, ज्या ठिकाणी त्याची डागडुजी, म्यूझियमचे नूतनीकरण यासाठी हा खर्च केला जात आहे. मात्र तोही सात कोटी नसल्याचा दावा मुनगंटावीर यांनी सभागृहात केलाय.

हेही वाचा -

  1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन पुन्हा राजकारण तापलं - shivaji maharaj Waghnkha
  2. लंडन येथून आणली जाणारी 'ती' वाघनखं शिवरायांची नाहीत, इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा दावा काय? - indrajit sawant claim
  3. वाघनखे भारतात आणण्यास होत आहे उशीर; विरोधकांचा हल्लाबोल तर सत्ताधाऱ्यांचे सडेतोड उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.