ETV Bharat / state

"महाविकास आघाडीला विधानसभेत..."; चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्धार, संघाच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार - Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जनतेला संभ्रमित केले. खोटे दावे करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आता जनतेलाही महाविकास आघाडीला मतदान केल्याचा पश्चाताप होत आहे. त्याचा बदला जनता आता विधानपरिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीत घेईल, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (13 जून) पालघर जिल्ह्यात पत्रकार परिषदेत केला.

Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 9:40 PM IST

पालघर Chandrashekhar Bawankule : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालघर जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली तसेच त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची बैठक मनोर येथील ‘सायलेंट रिसॉर्ट’मध्ये घेण्यात आली. यावेळी आमदार संजय केळकर, खासदार डॉ. हेमंत सवरा, माजी खासदार राजेंद्र गावित, माजी आमदार विलास तरे, माजी आमदार अमित घोडा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे, वीणा देशमुख, अशोक अंभूरे, विनोद मेढा, सुरेंद्र निकुंभ आदी यावेळी उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे हे महाविकास आघाडीवर टीका करताना (ETV Bharat Reporter)

आदिवासी, दलितात संभ्रम निर्माण करण्याचे षडयंत्र : बावनकुळे म्हणाले की, मोदी यांचे सरकार संविधान बदलणार आहे, असा संभ्रम महाविकास आघाडीने जनतेत निर्माण केला. आदिवासींसाठी असलेला ‘पेसा’ कायदा मोदी रद्द करणार असल्याची भीती आदिवासींना दाखवली. मोदी यांच्याबाबत दिशाभूल करणारी विधाने महाविकास आघाडी करीत होती. खोटे पण रेटून बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे षडयंत्र रचले गेले. त्याला बळी पडून जनतेने मोदी यांच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे लोकसभेला कमी जागा मिळाल्या.

मोदीविरोधी मतदानाचा जनतेला पश्चाताप : जनतेला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. मोदीचं काय?; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुन्हा आले, तरी त्यांना भारताची राज्यघटना बदलता येणार नाही. इतकी ती भक्कम आहे. त्याचबरोबर मोदी आदिवासींच्या कोणत्याही योजना बंद करणार नाहीत. उलट आदिवासींच्या योजनांसाठीचे बजेट त्यांनी वाढवले आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला.

महिलांच्या खात्यातील पैशाचे काय?: लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने महिलांच्या खात्यात दरमहा साडेआठ हजार रुपये, तर दर वर्षाला एक लाख रुपये जमा करण्याची योजना जाहीर केली होती. लोकसभा निवडणूक होऊन आता आठ दिवस झाले, तरी महिलांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. आता महिला त्या विरोधात काही ठिकाणी आंदोलन करीत आहेत. माझ्याकडे महिलांची निवेदने आली आहेत. खोटा प्रचार करून महाविकास आघाडीने जनतेची दिशाभूल केली. आता उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांनी महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा करणार हे सांगितले पाहिजे, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीला मत म्हणजे विकासविरोधी मत : महाविकास आघाडीला मत म्हणजे विकास विरोधकांना मत अशी संभावना करून बावनकुळे म्हणाले की, विरोधक सत्तेत आले तर ते विकासाच्या मोदींच्या संकल्पना धुडकावून लावतील. मोदी यांनी सुरू केलेल्या अनेक योजना बंद पाडतील. लोकांना रेशन मिळणार नाही. किसान सन्मान योजना बंद केली जाईल. विकासाच्या अनेक योजनांपासून महाराष्ट्र वंचित राहील, हे आता लोकांनाही पटले आहे. त्यामुळे विधानपरिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संघाच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार : राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे कोणीही उपस्थित नव्हते याकडे लक्ष वेधता बावनकुळे म्हणाले, की आम्ही सुनेत्रा पवार यांच्या सोबत आहोत. महायुतीचे आमदार त्यांनाच मतदान करणार आहेत. राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांची ही जागा असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. आम्ही गेलो नाही या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. ‘ऑर्गनायझर’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थित नियतकालिकात अजित पवार यांच्यावर करण्यात आलेली टीका आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिलेल्या उत्तरावर भाष्य करण्यास बावनकुळे यांनी नकार दिला.

राज यांच्या बरोबरच्या चर्चेतून मार्ग : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात विधानसभेच्या दोनशे ते सव्वादोनशे जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांना पाठिंबा दिला होता. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आता त्यांनी काही भूमिका घेतली असली, तरी अजून त्यांच्यासोबत आमची चर्चा व्हायची आहे. चर्चेतून निश्चित मार्ग निघू शकेल. आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, अजित पवार यांना घेऊन भाजपाचे कोणतेही नुकसान झाले नाही. उलट २०१९ च्या तुलनेत भाजपाची मते वाढली आहेत; मात्र जागा कमी झाल्या हे सत्य नाकारता येणार नाही. महाविकास आघाडीचे नेते पराभूत झाले तर पैशामुळे झाले. ईव्हीएममुळे झाले असे आरोप करतात; मात्र जिथे जिंकले तिथे मात्र ईव्हीएमबाबत संशय का घेत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचा :

  1. नागपुरात स्फोटक पदार्थांच्या कंपनीत मोठा स्फोट; पाच कामगारांचा होरपळून मृत्यू - NAGPUR Blast
  2. लोकसभेतील पराभवानंतर सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर लागणार वर्णी; अर्ज केला दाखल - Sunetra Pawar
  3. मनसेच्या इंजिनाची दिशा काय? विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे राज ठाकरेंचे आदेश - Raj Thackeray on Assembly Election

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.