पुणे : Sharad Pawar : या देशाचा एक इतिहास आहे. जेव्हा-जेव्हा हा देश अडचणीत आला आहे, तेव्हा-तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला आहे. आजचे शिवाजी साहेब झाले आहेत. आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ तोपर्यंत अस्वस्थता थांबणार नाही. एवढं आपल्या कृतीतून आपण दाखवून दिलं पाहिजे असं मत (Purushottam Khedekar) मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केलं. पुण्यातील (Balgandharva Rangmandir) बालगंधर्व रंगमंदिर येथे अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने 'अस्वस्थ तरुणाई आश्वासक साहेब' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे करण्यात आलं होतं. या वेळी पुरुषोत्तम खेडेकर, डॉ. कुमार सप्तर्षी, भूषणसिंह होळकर, रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, प्रशांत जगताप हे मंचावर होते.
पवारांनी प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली : या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची खचाखच गर्दी पाहायला मिळाली. शरद पवार येताच विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. विद्यार्थ्यांची एवढी गर्दी पाहता शरद पवारांनी बसायला जागा नसणाऱ्यांना मंचावर येवून बसायला सांगितलं. या सगळे वर मंचावर बसा, असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना वर मंचावर बोलवून घेतलं. यावेळी स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा आणि अडचणी शरद पवारांसमोर मांडल्या. यावेळी शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या सगळ्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.
दिल्लीत होणाऱ्या परेडचे नेतृत्व महिला करते : याच कार्यक्रमात एका विद्यार्थीनीने महिला सक्षमीकरणासंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारला. देशाच्या किंवा राज्याच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अतिशय कमी आहे, याची कारणं कोणती असू शकतात?, असं विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात महिलांना कमी लेखण्याची गरज नाही. कर्तृत्व तुम्ही महिला आहे की पुरुष यावर ठरत नाही. ज्या महिलांमध्ये कर्तृत्व आहे, त्यांना संधी दिली पाहिजे. संरक्षण दलात महिलांच्या समावेशाचा निर्णय मी घेतला. आज दिल्लीत होणाऱ्या परेडचे नेतृत्व महिला करते.
विद्यार्थ्यांच्या मागण्या पवारांनी मान्य केल्या : राज्याच्या विविध भागातून पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येत असतात. त्यात अनेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातून येतात. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या घरातील परिस्थिती हलाखीती असते. त्यात आई-वडिल पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात. हेच अनेक विद्यार्थी आपली परिस्थिती, कुटुंब आणि शिक्षण याचं समतोल राखत पुण्यात अभ्यास करत असतात. याच सगळ्यांच्या व्यथा आणि त्यांच्या मागण्या आज या विद्यार्थी संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद पवारांनी ऐकून घेतल्या.
हेही वाचा :
1 कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ 'डॅडी' कायमचा सुटणार, न्यायालयानं सरकारला दिले 'हे' निर्देश - Arun Gawali
2 भिवंडीमध्ये मविआत फूट? बाळ्यामामांना रिंगणात उतरवल्यानं बंडखोरीची शक्यता - LOK SABHA ELECTION 2024
3 आमदार रवी राणांपेक्षा त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा दुप्पट श्रीमंत! - Navneet Rana Property