ETV Bharat / state

पैशांसाठी पोटचा मुलगाच उठला जन्मदात्याच्या जीवावर; आधी बापाला संपवलं, मग आईचाही गळा आवळला, मात्र तेवढ्यात... - Sambhajinagar Crime News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 1:51 PM IST

Sambhajinagar Crime News : छत्रपती शंभाजीनगरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शेअर मार्केटमध्ये पैसे गमावल्यानंतर मुलगा आपल्या जन्मदात्यांच्या जीवावर उठला. त्यानं आधी बापाचा खून केला, नंतर आईचाही गळा आवळला, मात्र तेवढ्यात त्याची बहीण जागी झाल्यानं त्यानं तिथून पळ काढला.

Sambhajinagar Crime News
पैशांसाठी पोटचा मुलगाच उठला जन्मदात्याच्या जीवावर; आधी बापाला संपवलं, मग आईचाही गळा आवळला, मात्र तेवढ्यात...
नवनीत कांवत पोलीस उपायुक्त झोन-२

छत्रपती संभाजीनगर Sambhajinagar Crime News : कर्जबाजारी झालेल्या मुलानं जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना संभाजीनगरात समोर आलीय. इतकंच नाही तर त्यानं आईची देखील हत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक बहीण जागी झाल्यानं त्याचा प्रयत्न फसला आणि तो पळून गेला. त्यानं स्वतःच्या गळ्याला जखम करुन दरोडेखोरांनी घरावर हल्ला केल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांसमोर त्याचं नाटक उघडं पडलं आणि पोलिसांनी त्याला अटक केली. विशेष म्हणजे त्यानं हत्या करण्याबाबत इंटरनेटवर शोध घेतल्याचं तपासात समोर आलंय. श्रीकृष्ण पाटील (62) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर रोहित श्रीकृष्ण पाटील असं हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचं नाव आहे.

आठ दिवसांपासून खून करण्याचा प्रयत्न : रोहित गेल्या काही दिवसांपासून आपल्या कुटुंबाला संपवण्याचं नियोजन करत होता. वेगवेगळ्या पद्धतीनं हत्या करण्याच्या पद्धती त्यानं अभ्यासल्या. कुठलीही शंका न येता हे काम करण्याचा प्रयत्न सुरु केला. वडिलांना आधी संपवायचं त्यानं ठरवलं आणि आठ दिवस रोज त्यानं रात्री त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून विष दिलं. मात्र त्याचा परिणाम झाला नाही. सोमवारी त्यानं असाच प्रयत्न केला. दुपारी मद्य प्राशन करुन त्यानं परत इंटरनेटवर माहिती घेतली. घरी आला परत त्यानं आईस्क्रीम मध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. सकाळी लवकर उठला. वडील तळमजल्यावर झोपलेले असताना त्याने त्यांचा खून केला. नंतर त्यानं पहिल्या मजल्यावर जाऊन आईचा गळा आवळला त्याच वेळी बहीण जागी झाली आणि ते पाहून तो पळून गेला.

पैशांसाठी हत्या : रोहितला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची सवय होती. अनेक वेळा या व्यवहारांमध्ये त्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं. त्याचे वडील श्रीकृष्णा पाटील हे महावितरणमध्ये अधिकारी होते. त्यामुळे त्यांच्याकडे काही गंगाजळी राखून ठेवलेली होती. याआधी अनेक वेळा रोहितनं वडिलांकडून पैसे घेऊन आपला नुकसान पूर्ण केलं. मात्र यावेळेस त्याचं जवळपास 30 लाख रुपयांचं नुकसान झालं. तो वडिलांकडं सारखे पैसे देण्यासाठी तगादा लावत होता. मात्र इतकं मोठं नुकसान भरुन देण्यास वडील तयार झाले नाहीत. त्यामुळेच त्याने वडिलांची हत्या करायची आणि पैसे मिळवायचे, असा बेत आखून त्याप्रमाणे हत्येचं नियोजन सुरु केलं. वडिलांची हत्या करण्याची त्याची योजना यशस्वी झाली. मात्र तो जन्मदात्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची बहीण जागी झाली आणि त्याचं पितळ उघडं झालं. घरातील सर्व सदस्यांना संपण्याचा त्याचा मानस होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त नवनीत कांवत यांनी दिली.

हेही वाचा :

  1. पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयातून जन्मदात्या पित्यानं पोटच्या तीन मुलांचा खून करुन मृतदेह फेकले विहिरीत - Ambad Murder News
  2. नवजात बालकांची पाच लाखात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सहा महिलांना तीन दिवसांची पोलीस कोठडी - Child Trafficking Pune

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.