ETV Bharat / state

काँग्रेस सोलापूर लोकसभेला युवा नेतृत्व प्रणिती शिंदेंना संधी देणार? भाजपानंही केली जय्यत तयारी - प्रणिती शिंदे

Solapur LokSabha Constituency: काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपानं 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. यावेळेस काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वडिलांनी निर्माण केलेल्या बालेकिल्ल्यात आणि वडिलांच्या झालेल्या पराभवाचा बदला प्रणिती शिंदे घेणार की भाजपा पुन्हा आपली ताकद दाखवणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.

Solapur Lok Sabha Constituency
प्रणिती शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 4:03 PM IST

पुणे Solapur LokSabha Constituency : मागील दोन निवडणुकीत काँग्रेसचा गड ढासळण्यात भाजपाला यश आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा दोनदा सोलापूरमध्ये येऊन चांगली वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांना वाटते तितकी ही लढत सोपी नाही. परंतु, आता भाजपा आणि काँग्रेस यामध्येच मुख्य लढत होणार आहे. गेल्या वेळेस वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला मोठा फटका बसला होता. यावेळेस मात्र वंचित महाआघाडी सोबत असल्यानं काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जाणून घ्या पक्षांचे बलाबल: सोलापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य हे सोलापूरचे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी 2019 च्या निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांचा पराभव त्यांनी केला होता. सोलापूर मतदारसंघात मागासवर्गीय मतं, मराठा मतं आणि लिंगायत मत यांना मोठी किंमत आहे. सोलापूर शहरमध्ये उत्तर सोलापूर, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ या सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून लोकसभेचा सोलापूर मतदारसंघ तयार झाला आहे. पक्षाची ताकद बघायची झाली तर इथं सहापैकी चार मतदार संघात भाजपाचे आमदार आहेत. तर एक काँग्रेसचा आमदार आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अशी पक्षाची ताकद आहे.

असा आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास: 1962 साली काँग्रेसचा सोलापूर लोकसभेमध्ये उदय झाला. 1996 आणि 2003 या दोन निवडणुकीचा अपवाद वगळला तर 2014 पर्यंत काँग्रेसचं सोलापूर लोकसभेवर वर्चस्व होतं. 1962 साली आप्पासाहेब काडादी, 1967-1971-1977 सुरजरत्न दमानी, 1980-1984 गंगाधर कुंचन, 1989-1991 धर्मांना सादूल या काँग्रेस नेत्यानं खासदारकी केलेली आहे. 1998-99 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत विजय मिळवला. 2003 साली सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या सोलापूरच्या लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली. यात भाजपाच्या प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली. त्यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या सुभाष देशमुख यांनी विजयश्री प्राप्त केला.

काँग्रेसचा गडही गेला आणि सिंहही गेला...सुशीलकुमार शिंदे यांनी 2009 साली भाजपाचा विजय पुन्हा रोखला. भाजपाचे नवखे असलेले उमेदवार शरद बनसोडे यांचा पराभव करत सुशीलकुमार शिंदे पुन्हा एकदा लोकसभा मतदारसंघात निवडून आले. याच काळात शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय ऊर्जामंत्री, लोकसभेचे सभागृह नेते अशी मोठी पदे मिळाली. मात्र, 2014 च्या मोदी लाटेत शरद बनसोडे यांच्याकडून शिंदेंचा पराभव झाला. नवखे असलेले शरद बनसोडे तब्बल दीड लाख मतांनी विजयी झाले. 2019 साली झालेल्या दुसऱ्या निवडणुकीतदेखील सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाच्या डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी शिंदे सारख्या दिग्गज नेत्याला धूळ चारली. यावेळी वंचितचा फटका काँग्रेसला बसला.

प्रणिती शिंदेंवर कॉंग्रेसची भिस्त: सोलापूर जिल्ह्यात जातीय समीकरणे बघितली तर लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर इतर मागासवर्गीय आणि मराठा समाजाची मतदार ही महत्त्वाची गोष्ट आहे. काँग्रेसकडून यावर्षी नवीन चेहरा आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या प्रणिती शिंदे यांना उभं करण्यात येणार आहे. त्यांना नुकतेच काँग्रेसच्या वर्किंग कमिटीतसुद्धा घेण्यात आलं आहे. एकीकडं काँग्रेसमधून दिग्गज नेते जात असताना प्रणिती शिंदे यांनी मात्र मी काँग्रेसमध्ये राहणार, असं सांगितलं असल्यानं त्यांना काँग्रेस मोठी जबाबदारीसुद्धा देऊ शकतं. गेल्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर हे उभे ठाकल्यानं काँग्रेसला मोठा फटका बसला. यावर्षी मात्र ते महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस हा बालेकिल्ला परत आणणार असं वाटत आहे. भाजपानं लोकसभेची पूर्ण तयारी केली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दौरा करून 15 हजार घरांचं उद्घाटन केलेलं होतं.

सोलापूर मतदार संघातील 'या' आहेत समस्या: लोकसभेच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोजगाराच्या संधी नसल्यानं तरुण जिल्ह्याबाहेर जातात. चादरीच्या उद्योगात मंदी आहे. बिडी कामगाराचे प्रश्न तसेच आहेत. पाणीटंचाई ही खूप मोठी समस्या आहे. मोहोळ, सोलापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये नेहमी पाणीच पाणी असतं. या मतदारसंघात लिंगायत समाजाची मतं महत्त्वाची आहेत. तर मराठा आणि मागासवर्गीय मतदारांची मते निर्णयाक असतात. सोलापूरच्या विमान सेवेचा प्रश्नही प्रलंबित आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यानंतर आता विमान सेवा सुरू होणार का? हाही प्रश्न आहे. सर्वाधिक ऊसाचे कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांच्यापुढेही मोठे संकट आहे.

भाजपानेही कसली कंबर: भाजपाकडून यंदा कुणाला तिकीट मिळेल, याचीही चर्चा मोठी आहे. डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जातीचे दाखले न्यायालयात वादग्रस्त ठरत आहेत. त्यामुळे नव्या उमेदवाराला संधी मिळणार, अशी चर्चा आहे. यामध्ये सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडे, माळशिरसचे आमदार राम सातपुते, अमर साबळे यांचे नाव भाजपाकडून चर्चेत आहेत. तर शरद पवार गटाकडून सुधीर खरटमल हेसुद्धा तयारीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसकडून तशी सगळी तयारीसुद्धा सुरू केलेली आहे. त्यामुळे नवीन उमेदवार भाजपा देणार का? हा प्रश्न आहे. विद्यमान आमदार असलेले विजय देशमुख यांनीसुद्धा आता अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढलं असल्याची माहिती आहे. कदाचित तेही या ठिकाणी उमेदवार असू शकतात, असं भाजपाकडून बोलले जात आहे. त्यामुळे भाजपा कुठल्याही परिस्थितीत लोकसभा कायम आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

हेही वाचा:

  1. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी, जम्मू काश्मीरातही 30 ठिकाणी छापे; काय आहे प्रकरण?
  2. मराठा आंदोलनात फूट; मनोज जरांगेंच्या आंदोलनामागं शरद पवारांचं पाठबळ; जरांगेंच्या आणखी एका सहकाऱ्याचा गंभीर आरोप
  3. पंतप्रधान मोदींच्या लेखणीची किंमत २५ लाख; संजय राऊतांनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.