ETV Bharat / state

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : जीआरपीच्या एसीपीचा नोंदवला जबाब; उद्या भिंडेला करणार न्यायालयात हजर - Ghatkopar Hoarding Collapse Case

Ghatkopar Hoarding Collapse Case : घाटकोपर इथं होर्डिंग कोसळून तब्बल 17 नागरिकांचा मृत्यू झाल्यानं देशभरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी भावेश भिंडे याला अटक केली आहे. त्याची कोठडी आज संपणार आहे. तर एसआयटीनं जीआरपीचे सहायक पोलीस आयुक्त शहाजी निकम यांचा जबाब नोंदवला आहे.

Ghatkopar Hoarding Collapse Case
कोसळलेलं होर्डिंग (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 3:23 PM IST

मुंबई Ghatkopar Hoarding Collapse Case : घाटकोपर होर्डिंग कोसळल्यानं तब्बल 17 बळी गेले आहेत. या प्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या एसआयटीनं समन्स बजावलेले रेल्वे पोलीस (जीआरपी) सहायक पोलीस आयुक्त शहाजी निकम मंगळवारी सकाळी एसआयटीसमोर हजर झाले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. या प्रकरणातील पहिला आरोपी भावेश भिंडे याची पोलीस कोठडी उद्या संपत असून पुन्हा त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

शहाजी निकम यांचा जबाब महत्त्वाचा : अटक करण्यात आलेल्या आरोपी भावेश भिंडेला होर्डिंगची परवानगी देताना जीआरपीमध्ये सर्व प्रक्रिया पाळल्या गेल्या होत्या का, हे शोधण्यासाठी शहाजी निकम यांचा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे. एसआयटीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, "शहाजी निकम मंगळवारी सकाळी एसआयटीसमोर हजर झाले. एसीपी शहाजी निकम काही कागदपत्रे विसरले. त्यामुळे त्यांना परत जावं लागलं. रात्री उशिरापर्यंत त्यांचा जबाब नोंदवला गेला आहे.

जीआरपीनं होर्डिंगसाठी भिंडे याला कशी दिली परवानगी : पोलीस अधिकाऱ्यानं पुढं सांगितलं की, "जीआरपीनं होर्डिंगसाठी भिंडे याला कशी परवानगी दिली होती, याची माहिती असल्यानं एसीपी शहाजी निकम यांचा जबाब या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा ठरेल. त्यांच्या जबाबाच्या आधारे ते या प्रकरणात इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवावे लागेल, की नाही याबाबत पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल. होर्डिंगसाठी परवानग्या देण्याशी संबंधित काही कागदपत्रांवर एसीपीचे नाव असल्यानं त्यांना त्यांचं म्हणणं रेकॉर्ड करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. पोलीसही महापालिकेला पत्र लिहून त्यांच्या अधिकारक्षेत्रात कोणतीही कारवाई न करता बेकायदेशीर होर्डिंग कसं येऊ दिलं, याचा तपास करणार आहेत." 13 मे रोजी घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता. एसआयटीनं होर्डिंगचा मालक भावेश भिंडे याला अटक केली असून उद्यापर्यंत तो पोलीस कोठडीत आहे. उद्या त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत वाढ, 29 मे पर्यंत सुनावली कोठडी - Bhavesh Bhinde Police Custody
  2. कैसर खालिद यांच्या अडचणीत वाढ; निविदा प्रक्रिया वगळून दिली होती होर्डिंगला परवानगी - Ghatkopar Hoarding Case
  3. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण : उदयपूरमध्ये लपलेल्या भावेश भिंडेला पोलिसांनी आणलं मुंबईत, दुपारी करणार न्यायालयात हजर - Ghatkopar Hoarding Collapse Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.