मुंबई SIT Against Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी आज अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गदारोळ झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांच्याविरोधात एसआयटी चौकशी नेमण्याचं जाहीर केलं.
मनोज जरांगे यांच्या आरोपांवर एसआयटी चौकशी : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या आरोपांवर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गदारोळ झाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपावर एसआयटी चौकशी नेमण्यात यावी, असे आदेश दिले. त्यामुळं मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे यांना अटक करा : "मनोज जरांगे यांच्या आंदोलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर आरोप करण्यात येत आहेत. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना कानाखाली मारली असती, असं म्हणल्यानं त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. मग आता जरांगेंना संरक्षण का दिलं जात आहे," असा सवाल विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी केला. यावेळी त्यांनी "तत्काळ मनोज जरांगेंना अटक करा," अशी मागणी केली. "मनोज जरांगे यांना कोणाचा पाठींबा आहे, याची चौकशी झाली पाहिजे. राजेश टोपे यांच्या कारखान्यावर कोणाच्या बैठकी झाल्या, याची चौकशी करण्यात यावी. या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांच्यासह शरद पवार हे देखील मनोज जरांगे यांना फोन करत होते, त्यामुळं याची चौकशी करण्यात यावी," अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली.
हेही वाचा :