ETV Bharat / state

15 दिवसांची कैद स्थगित; मेधा सोमैया मानहानी प्रकरणात संजय राऊतांना जामीन मंजूर

मीरा भाईंदर येथील शौचालय निर्मितीत मेधा सोमैया यांनी घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यावर सोमैया यांनी माझगाव न्यायालयात मानहानीचा खटला राऊतांविरोधात दाखल केला होता.

SANJAY RAUT DEFAMATION CASE
मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊतांना जामीन (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2024, 5:28 PM IST

Updated : Oct 25, 2024, 6:05 PM IST

मुंबई : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांच्या पत्नी मेधा सोमैया यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद व 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. या प्रकरणी आज (25 ऑक्टोबर) माझगाव न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाकडून 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर संजय राऊतांना जामीन देण्यात आलाय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊतांना मोठा दिलासा मिळालाय.

राऊतांनी सोमैया कुटुंबावर केला होता आरोप : माझगाव येथील अतिरिक्त महानगर दंडाधिकारी आरती कुलकर्णी यांच्या न्यायालयानं हा दंड व शिक्षा ठोठावली होती. कोरोनाच्या काळात एका शौचालय घोटाळ्यामध्ये भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया व त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या व त्यांच्या कुटुंबियांचा सहभाग असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. खासदार राऊत यांच्या या आरोपांविरोधात मेधा सोमैया यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात संजय राऊत यांना दोषी ठरविण्यात आलं असून त्यांना 15 दिवसांची कैद व 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. याप्रकरणी शुक्रवारी राऊत माझगाव न्यायालयात हजर झाले. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला. याप्रकरणी पुढील सुनावणी 21 जानेवारी 2025 रोजी होईल.

सुनील केदार यांनी राऊतांची घेतली भेट : ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत यांना शिक्षा ठोठावण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. नंतर न्यायालयानं संजय राऊत यांना अपील करण्यासाठी वेळ देऊन शिक्षेला स्थगिती दिली होती. शुक्रवारी या प्रकरणी राऊत न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांना जामीन मिळाल्यानं त्यांना दिलासा मिळालाय. संजय राऊत गेले काही दिवस महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेमध्ये व्यस्त होते. जागावाटपाची चर्चा अद्याप पूर्ण झालेली नाही. संजय राऊतांना भेटण्यासाठी माझगाव न्यायालय परिसरात कॉंग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार आले होते. त्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

हेही वाचा

  1. कोकणात जाणारी चिपी ते मुंबई विमानसेवा शनिवारपासून बंद होणारच; नेमकं कारण काय?
  2. देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज दाखल; नितीन गडकरी, बावनकुळेंसह बड्या नेत्यांची हजेरी
  3. जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना; ही तर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी 'मारामारी'

Last Updated : Oct 25, 2024, 6:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.