ETV Bharat / state

आदित्य-अमित ठाकरे बंधू नातं जपणार आणि आमदारकीही मिळवणार, वरळीतून मनसे तर माहिममधून उबाठा घेणार माघार?

विधानसभा निवडणूक 2024 साठी आदित्य-अमित हे ठाकरे बंधू रिंगणात आहेत. नातं टिकवण्यासह आमदारकीही मिळवण्यासाठी शिवसेना (उबाठा) आणि मनसे अनुक्रमे माहिम, वरळीतून माघार घेण्याची शक्यता आहे.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2024, 5:08 PM IST

Updated : Oct 28, 2024, 6:58 PM IST

मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी रंगली आहे. या निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष वरळी विधानसभा मतदार संघ आणि माहिम मतदार संघावर खिळलं आहे. वरळीतून उद्धव ठाकरे यांचे विद्यमान आमदार पुत्र आदित्य पुन्हा मैदानात उतरले आहेत. तर माहिममधून राज ठाकरे यांचे पुत्र अमित पहिल्यांदाच विधानसभेसाठी स्वतःचं नशीब आजमावणार आहेत. दोन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेना (उबाठा) आणि मनसे उमेदवारांनी एकमेकांना आव्हान दिलं आहे.

समीकरण जुळणार का? : वरळीतून मनसेचे संदीप देशपांडे तर माहिममधून शिवसेना (उबाठा) चे महेश सावंत निवडणूक लढवत आहेत. मात्र आता हे दोन्ही उमेदवार आपापली उमेदवारी मागे घेणार असल्याची दाट शक्यता आहे. तशा हालचाली पडद्यामागे घडत आहेत. वरळी मतदार संघातून मनसेचे संदीप देशपांडे तर माहिम मतदार संघातून महेश सावंत या दोघांनी उमेदवारी मागे घेण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असल्याची खात्रीलायक माहिती 'ईटीव्ही भारत'ला उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

अद्याप अशा प्रकारची माहिती उपलब्ध झालेली नाही. राजकारणात काहीही होऊ शकतं. जर का अशा पद्धतीची समीकरणं जुळून आली तर त्याचा सर्वाधिक आनंद मला होणार आहे. ठाकरे बंधू एकत्रित राहावेत ही माझी पहिल्यापासूनची इच्छा आहे. आदित्य ठाकरे असो किंवा अमित ठाकरे, दोघांचाही विजय व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. - बाळा नांदगावकर, मनसे नेते

संदीप देशपांडे आणि महेश सावंत घेणार अर्ज मागे : उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंमधला कलह जगजाहीर आहे. तरीही 2019 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या पुतण्यासमोर आपल्या पक्षाचा उमेदवार न देण्याचा दिलदारपणा राज ठाकरे यांनी दाखवला होता. 2024 विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून अमित ठाकरे यांच्या उमेदवारीची घोषणा होताच उद्धवसुद्धा 'राज'मार्गावर चालतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण राज यांनी वरळीतून संदीप देशपांडे यांची उमेदवारी आधीच जाहीर केल्यामुळे उद्धव यांनीसुद्धा माहिम मतदारसंघातून महेश सावंत यांची उमेदवारी जाहीर केली.

सकारात्मक चर्चा : आता मात्र दोन्ही भाऊ एकमेकांच्या दिशेनं दोन दोन पावलं पुढे चालत येण्याची शक्यता आहे. "सावंत आणि देशपांडे यांची माघार घ्यावी, यादृष्टीने चर्चा सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे ही चर्चा सकारात्मक वळणावर आहे. येत्या दोन दिवसांत याविषयीचं चित्र स्पष्ट होईल," अशी माहिती उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयाने दिली आहे.

नातं जपणार, आमदारकीही मिळवणार : वरळी मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांनी राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरा यांना मिळणाऱ्या एकत्रित मतांचा आदित्य ठाकरे यांना फटका बसू शकतो. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये दक्षिण मुंबईतून पुन्हा खासदारकी जिंकणाऱ्या अरविंद सावंत यांना आदित्य प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून अगदी कमी मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. तर दुसरीकडे माहिममधील शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर अमित ठाकरे यांच्यासाठी माघार न घेता आमदारकी लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

मनधरणी करण्याचे केलेले प्रयत्न फोल ठरले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची मनधरणी करण्याचे केलेले प्रयत्न फोल ठरले आहेत. सरवणकर रिंगणात राहिले तर अमित ठाकरे यांना त्यांच्या होमपीचवर एरवी सोपा वाटणारा विजय अवघड होऊ शकतो. प्राप्त परिस्थितीत माहिम आणि वरळीमधून अनुक्रमे सावंत आणि देशपांडे यांना माघार घ्यायला लावणं उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंसाठी राजकीय शहाणपणाचं ठरणार आहे. त्यामुळे आदित्य आणि अमित दोघांचाही विधानसभेत आमदार म्हणून पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. शिवाय दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या मतदारांना ठाकरे बंधूंनी नातं जपल्याचंही समाधान लाभणार आहे.

रात्र वैऱ्याची असणार : याबाबतीत पडद्यामागच्या हालचालींना वेग आला आहे. उद्धव आणि राज दोघांनाही विशेषतः उद्धव यांना आपला निर्णय लवकर जाहीर करावा लागणार आहे. कारण सदा सरवणकर यांचं मतपरिवर्तन झालं तर अमित यांच्यापुढे मोठं आव्हान उरणार नाही. अमित ठाकरे आणि महेश सावंत यांच्यात थेट लढत झाल्यास अमित ठाकरे यांचं पारडं जड आहे. लवकर निर्णय न झाल्यास ठाकरे बंधूंसाठी माहिम आणि वरळी मतदारसंघांच्या बाबतीत रात्र वैऱ्याची असणार आहे, याची जाणीव उद्धव आणि राज दोघांनाही आहे.

हेही वाचा :

  1. अमित ठाकरे आणि सदा सरवणकर एकाच दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज, 'राज'पुत्राला मिळणार कमळाची साथ?
  2. अमित ठाकरेंच्या विरोधात तुम्ही उमेदवार दिलाय; आदित्य ठाकरे म्हणतात...
  3. अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी महायुतीमधील नेत्यांचा सूर; सदा सरवणकर म्हणाले, "उमेदवारी अर्ज...."

Last Updated : Oct 28, 2024, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.