ETV Bharat / state

शिरूर लोकसभा मतदार संघाचा तिढा कायम! उमेदवार कोण असणार; नेता की अभिनेता? - Shirur Lok Sabha Constituency

Shirur Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणूक कधीही लागेल अशी परिस्थिती असताना शिरूर लोकसभा मतदारसंघात मात्र उमेदवारीचा तिढा कायम आहे. खासदार अमोल कोल्हे यांना पाडण्याचा चंग अजित पवार यांनी बांधल्याने त्यांच्या विरोधात अभिनेताच देणार असं ते म्हणाले होते. आता या जागेवर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 3:55 PM IST

पुणे Shirur Lok Sabha Constituency : देशात लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. सर्वत्र राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्षाने आपली लोकसभा जागांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण राज्यातल्या कुणाचंच त्यात नाव नाही. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या शिरूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार हे सेलिब्रिटी उमेदवार शोधत असून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी चर्चा केली असल्याचं सांगितलं जात आहे. तर, दुसरीकडे शिरूरची जागा ही अजित पवार यांनी सोडली असून या जागेवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा : राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नसून महायुतीत भाजपा 35 जागा लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार यांना 3 जागा, तर शिवसेना एकनाथ शिंदे यांना 8 जागा देणार असल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असून आंबेडकर यांच्या प्रस्तावावर एकमत होत नसल्याचं सांगितलं जात आहे. अशा परिस्थितीत महायुतीत अजित पवार हे शिरूर, बारामती, रायगड, सातारा, आणि भंडारा यांसह 9 जागा लढवणार असल्याचा प्रस्ताव दिला होता. पण आता शिरूरमध्ये अजित पवार यांना उमेदवारच सापडत नसल्याने ही जागा भाजपाकडे जाणार असल्याची चर्चा आहे.

भाजपाकडं जाणार असल्याची चर्चा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर अजित पवार यांनी थेट खासदार अमोल कोल्हे यांनाच 'आता निवडूनच कसा येतो हे पाहतो' असं आव्हान दिलं आहे. यानंतर सातत्याने पवार हे कोल्हे यांच्या मतदार संघात मेळावा घेत त्यांच्यावर टीका करत आहेत. शिरूरमध्ये राष्ट्रवादीकडून विलास लांडे हे इच्छुक आहेत. तर आढळराव पाटील हे देखील शिवसेनेकडून इच्छुक आहेत. तर भाजपाकडून महेश लांडगे हे इच्छुक आहेत. शिवसेनेचे नेते आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवणार असल्याचं बोललं जात असतानाच आता ही जागा भाजपाकडं जाणार असल्याची जोरदार सुरू झाली आहे.

हेही वाचा :

1 सुधा मूर्ती यांना राज्यसभेचे खासदार म्हणून नामांकन, पंतप्रधान मोदी यांनी केलं अभिनंदन

2 तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटील यांच्या आदेशानुसार वकील म्हणून नियुक्ती, किशोर भालेरावांना न्यायालयाचा दिलासा

3 मराठा आरक्षणावरुन मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश; आरक्षणावर पुन्हा प्रश्नचिन्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.