शिर्डी Shirdi Sai Sansthan Election : शिर्डी साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनेलनं सर्वच्या सर्व 17 जागा जिंकून इतिहास रचला आहे.
53 उमेदवार रिंगणात होते : सोसायटीच्या 17 जागांसाठी रविवारी मतदान झालं. 1666 मतदार असलेल्या या निवडणुकीत 53 उमेदवार आपलं नशीब अजमावत होते. निवडणुकीत 97.5 टक्के मतदान झालं. तिरंगी लढतीत दोन अपक्ष उमेदवारही रिंगणात होते. मतदारांनी विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वावर विश्वासाची मोहर उमटवली आहे.
परिवर्तन पॅनेलचा विजय : पवार यांच्या परिवर्तन विकास मंडळाच्या विरोधात माजी अध्यक्ष प्रताप कोते आणि यादवराव कोते यांचा साई जनसेवा आणि माजी अध्यक्ष राजेंद्र जगताप यांचा साई हनुमान जनसेवा पॅनलनं लढत दिली. विठ्ठल पवार यांनी सर्व प्रस्थापितांचा पराभव करत विजयश्री खेचून आणली आहे.
हा सामान्य मतदारांचा विजय आहे. परिवर्तन फक्त सोसायटीत करून थांबणार नाही. कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याचा संस्थान दरबारी, प्रसंगी न्याय देवतेकडे पाठपुरावा करून, सगळ्यांना बरोबर घेऊन संस्थान कामगारांच्या जीवनात परिवर्तन आणणं हेच आमचं अंतिम ध्येय आहे. - विठ्ठल पवार, परिवर्तन पॅनेल
परिवर्तन विकास मंडळाचे विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेले मतं पुढील प्रमाणे :
- पोपट कोते - ७९४
- महादू कांदळकर - ८४७
- भाऊसाहेब कोकाटे - ८३७
- मिलिंद दूनबळे - ७६९
- संभाजी तुरकणे - ८२४
- विनोद कोते - ७८७
- इक्बाल तांबोळी - ६६७
- देवीदास जगताप - ८१३
- तुळशीराम पवार - ७४९
- भाऊसाहेब लवांडे - ७०८
- कृष्णा आरणे - ८४५
- रविंद्र गायकवाड - ७१८
- रंभाजी गागरे - ८९६ (भटक्या विमुक्त जाती)
- गणेश अहिरे - १०२१ (अनुसूचित जाती)
- विठ्ठल पवार - १२३४ (इतर मागास प्रवर्ग)
- लता बारसे - ८६३
- सुनंदा जगताप - ९२७
हे वाचलंत का :