पुणे : आतापर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं निवडणुकीत अनेक यश मिळवलं, तसच यश आम्ही पुढं मिळणार आहे. "पक्ष काढला मी, वाढवला मी, अन् काही लोकांनी त्यावर कब्जा केला," असा जोरदार हल्लाबोल शरद पवार यांनी अजित पवार यांचं नाव न घेता केला. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील उद्योग आणि कारखाने गुजरातला पळवले, अशी जोरदार टीका शरद पवार यांनी केली.
पक्ष मी काढला, लोकांनी कब्जा केला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार हे भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार भाजपासोबत गेल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. मात्र त्यानंतर राज्यात प्रचंड प्रमाणात घडामोडी घडल्या. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामतीत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "पक्ष मी काढला, मी वाढवला, मात्र काही लोकांनी त्यावर कब्जा केला. हे प्रकरण दिल्लीतील न्यायालयात गेलं, निवडणूक आयोगाकडंही गेलं. मला पहिल्यांदा न्यायालयात उभं राहावं लागलं. मी चार चार वेळेस मुख्यमंत्री होतो, केंद्रात मंत्री होतो. मात्र कधीही मला न्यायालयात उभा राहिलो नाही," असं शरद पवार यावेळी म्हणाले.
शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका : "महाराष्ट्रात उद्योजक रतन टाटा यांनी 40 लाख लोकांना रोजगार दिला. आता मात्र महाराष्ट्र राज्यातील एकेक उद्योग गुजरातला पळवून नेल्या जात आहे. महाराष्ट्रातील विमानांचा कारखाना गुजरातला गेला. पंतप्रधान देशाचे असतात, एका राज्याचे नसतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ एका राज्याचा विचार केला," असा जोरदार हल्लाबोल शरद पवार यांनी केला.
हेही वाचा :