ETV Bharat / state

शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक; राज ठाकरेंकडं चर्चेसाठी मांडला प्रस्ताव - Shantigiri Maharaj Contest Loksabha

Shantigiri Maharaj Contest Loksabha : बाबाजी भक्त परिवाराचे शांतीगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. आपल्याला मनसेकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडं (Raj Thackeray) भेटीकरिता वेळ मागितला आहे. त्यामुळं अनेक चर्चा रंगल्या आहेत.

Nashik LokSabha Constituency
शांतिगिरी महाराज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 9:26 PM IST

Updated : Mar 9, 2024, 9:55 PM IST

शांतिगिरीजी महाराज यांच्या उमेदवारीविषयी बोलताना रामानंदजी महाराज

नाशिक Shantigiri Maharaj Contest Loksabha : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक संत, महंत निवडणूक रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. बाबाजी भक्त परिवाराचे शांतीगिरी महाराज देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक अशा दोन पैकी एका मतदारसंघातून ते लढणार आहेत. तरी त्यांनी निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वेळ मागितल्यानं वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय.

राज ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली : नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा करत श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यामुळे यंदा नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणाऱ्या संत महंतांचा कल भाजपाकडे असल्याचं दिसतंय. मात्र, अशात शांतीगिरी महाराज यांनी मनसेकडं कल दाखवल्याचं जाणवतंय. मनसेनं नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप उमेदवारी निश्चित नाही. "तुम्ही तयारी करा मी उमेदवारीचं बघून घेईन", असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. अशात आता शांतीगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

शांतीगिरी महाराजांची ओळख : जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतलाय. देशभक्ती आणि राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी महाराज निवडणूक लढवणार असल्याचं भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी सांगितलं. नाशिक मतदारसंघात जय बाबाजी परिवाराची संख्या तीन लाखाहून अधिक आहे. शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत. लाखोंच्या संख्येनं त्यांचा भक्त परिवार आहे. प्रवचन, भजन, अनुष्ठान, सत्संगच्या माध्यमातून ते धार्मिक कार्यात पुढाकार घेतात. देशभरात त्यांचे 115 आश्रम आहेत. 7 गुरुकुल देखील ते चालवितात. अनुष्ठानच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठे कार्य केले आहे. त्यांची मौनीगिरी महाराज अशीही ओळख आहे. याआधी त्यांनी तब्बल 12 वर्ष मौन पाळले होते. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये बाबाजी परिवारानं मोठा सत्संगचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात राज्यभरातून लाखो भक्त सहभागी झाले होते. तसेच अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनीसुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

अद्याप राज ठाकरेंशी चर्चा नाही : येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. राजकीय नेते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. "महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. बाबाजी परिवारमध्ये सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यातील काही जणांनी महाराजांनी मनसेकडून उमेदवारी घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, यावर अद्याप राज ठाकरे यांच्याशी कुठलीही चर्चा किंवा निर्णय झाला नाही. बाबाजी निवडणूक लढवणार आहेत, हे मात्र निश्चित असून यासाठी बाबाजींचे भक्त लोकसभा मतदारसंघातील लाखो लोकांपर्यंत पोहचले आहेत," असं बाबाजी परिवाराचे प्रवक्ते ब्रह्मचारी रामानंदजी महाराज यांनी सांगितलं.

'हे' महाराज देखील निवडणुकीसाठी इच्छुक : स्वामी कंठानंद यांच्यासाठी नाशिकचे काही उद्योजक, वैद्यकीय क्षेत्र आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून स्वामींच्या उमेदवारीसाठी साकडं घातलंय. स्वामी कंठानंद हे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य परंपरेतील आहेत. त्यांनी नाशिकमध्ये 2005 मध्ये श्रीकृष्ण आरोग्य संस्था सुरू केली आणि त्या माध्यमातून सेवा कार्य करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी प्रमाणे नाशिक तीर्थक्षेत्रामधून लोकसभा निवडणूक लढवली तर हा महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ ठरेल. यामुळं रखडलेली कामं मार्गी लागतील आणि नाशिकचा मंत्रभूमी ते यंत्रभूमी हा प्रवास खऱ्या अर्थानं पूर्ण होईल, अशी इच्छा महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी व्यक्त केली होती. मात्र, पंतप्रधान मोदींनी हा प्रस्ताव मान्य न केल्यास नाशिकचा धार्मिक, आध्यात्मिक विकास व पर्यटन वाढवण्यासाठी आपण इच्छुक आहोत. भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिल्यास आपण नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू, असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. मुंबईतील 'या' स्थानकाचं नामकरण; विरोधकांच्या आरोपांना राहुल शेवाळेंचं प्रत्युत्तर
  2. "भाजपावाले श्रीरामालाही म्हणाले असते भाजपा जॉईन कर नाहीतर..."; अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल
  3. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दाखवलं 'सत्तेचं गाजर'; म्हणाले, "संयम राखा..."

Last Updated : Mar 9, 2024, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.