ETV Bharat / state

शांतिगिरी महाराज यांचा 'हार' चर्चेत, मतदानानंतर काय केलं? - Shantigiri Maharaj Nashik News - SHANTIGIRI MAHARAJ NASHIK NEWS

Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजता मतदान सुरळीतपणे सुरू झाले. या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनला हार घातल. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला.

Nashik Lok Sabha Shantigiri Maharaj hang garland to EVM Machine
मतदानाचा हक्क बजावत शांतीगिरी महाराजांनी घातला ईव्हीएम मशीनला हार (reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 9:45 AM IST

शांतीगिरी महाराजांनी घातला ईव्हीएम मशीनला हार (reporter)

नाशिक Lok Sabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांचा समावेश आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच मतदानाला सुरळीतपणे सुरुवात झाली. नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी आज पहाटे त्रंबकेश्वरच्या मंदिरात पूजा विधी करत अभिषेक केला. मंदिरातील दर्शन झाल्यानंतर सात वाजता त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान झाल्यावर स्वामी शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम मशीनला आपल्या गळ्यातील हार घातला.

योग्य उमेदवाराला मतदान करा : शांतिगिरी महाराज म्हणाले, "लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान करून आपण एक आदर्श निर्माण करू. आपल्या हृदयातील भगवंताला विचारावं की मतदान कोणाला करावं? आपण आपला मतदानाचा हक्क बजावावा," असं माध्यमांशी संवाद साधत असताना महाराज म्हणाले.

नाशिकमध्ये तिरंगी लढत : नाशिक लोकसभा मतदारसंघात 31 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. मात्र, असं असलं तरी मुख्य तिरंगी लढत या मतदारसंघात बघायला मिळणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दहा उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यात प्रमुख लढत असणार आहे.

मतदान मदत केंद्र क्रमांक 1950 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगानं मतदारांना त्यांचं नाव मतदार यादीत आहे की नाही? याबाबतची माहिती मिळावी यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी/मतदार नोंदणी अधिकारी यांचे नियंत्रण कक्ष तसंच मतदान मदत केंद्र क्रमांक 1950 येथे संपर्काची सुविधा मुख्य निवडणूक अधिकारी यांनी उपलब्ध करून दिली आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर मतदारानं सध्याच्या निवासाचा पत्ता किंवा विचारण्यात येणारा इतर तपशील सांगितल्यास सदर केंद्रावरील कर्मचारी मतदाराचं नाव शोधून देण्यासाठी सहकार्य करतील.

हेही वाचा -

  1. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात, कशी आहे मतदान केंद्रावर परिस्थिती? - Lok Sabha Election 2024
  2. लोकसभा निवडणूक 2024 : देशातील आठ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांवर मतदानाला सुरुवात - Lok Sabha Election 2024
  3. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज होणार मतदान, महाराष्ट्रातील 'या' नेत्यांमध्ये होणार 'टाईट-फाईट' - Lok Sabha Elections 5th Phase

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.