मुंबई : Kalyan Lok Sabha : महायुतीतील कल्याण लोकसभा मतदारसंघ लढण्यासाठी भाजपा आग्रही होता. तसंच, स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात नाराजी पाहायला मिळत होती. त्या संदर्भात स्थानिक नेते आमदार गणपतराव गायकवाड यांनी तर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला सरळ विरोध दर्शवला होता. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वतः श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असल्याची घोषणा केल्यानंतर ती नाराजी दूर होणार आहे. महायुतीच्या सुत्रांप्रमाणे दिलेल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याचं सूत्र ठरलेलं आहे. पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचं त्या-त्या पक्षप्रमुखांनी महायुती ठरलेलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांनी प्रचंड काम केलेलं आहे. महायुतीतील तिन्ही घटक पक्ष आणि मित्र पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहेत. त्यामुळे आता ही नाराजी त्या ठिकाणी राहणार नसल्याचंही शंभूराज म्हणाले आहेत.
शिवसेनेची पद्धत नाही : कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे (Srikant Shinde) यांची उमेदवारी घोषित करण्यासाठी उशीर का लागला? यावर बोलताना देसाई म्हणाले, त्या मतदारसंघातील उमेदवारी विषयी कयास काही लोकांनी लावले होते. स्वतःच्या ताटात पहिल्यांदा वाढवून घ्यायचं ही शिवसेनेची पद्धत नसल्याचं शंभूराज देसाई म्हणाले आहेत. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी पक्ष जाहीर करू शकला असता. परंतु पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मात्र अडीच वर्षांपूर्वी आपण बघितलं असेल एकाच कुटुंबातील सरकारचं नेतृत्व मोठे नेते करत होते आणि त्यांचे युवराज मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत मंत्रिमंडळात आले असं म्हणत उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता देसाई यांनी ठाकरे पिता पुत्राला टोला लगावला आहे. मात्र तसं महायुती आणि शिवसेनेत नाही आधी कार्यकर्त्यांचा मानसन्मान करायचा, कार्यकर्त्यांचा विचार करायचा आणि नंतर कुटुंबाचा परिवारातील लोकांचा नंतर विचार करायचा ही नेहमीची पद्धत आहे. पहिले माझ्या ताटात वाढून घ्यायचं आणि दुसऱ्याची ताटं मोकळी ठेवायची ही शिवसेनेची काम करण्याची पद्धत नसल्याचं देसाई यांनी सांगितलं.
महायुतीचे तीनही नेते सन्मानजनक मार्ग काढतील : ठाणे, नाशिक लोकसभा मतदारसंघा संदर्भात चर्चा सुरू आहे. 2019 साली शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर ज्या लोकसभा मतदार संघात निवडणुका लढल्या त्या जागांवर आमचा आग्रह कायम आहे. मात्र, महाराष्ट्रातील महायुतीतील तीन वरिष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघजण एकत्र बसून, सगळ्या जागांवरील कुणाची नाराजी राहणार नाही अशाप्रकारे सन्मानजनक तोडगा काढतील, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना आग्रही आहे. मात्र, याबाबत निर्णय महायुतीतील तीनही नेते घेतील असंही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा :
1 हुश्श! अखेर उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांच्या पुत्राची उमेदवारी जाहीर - Devendra Fadnvis