ETV Bharat / state

मुंबईत बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती, दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ - Sexual harassment of minor girls - SEXUAL HARASSMENT OF MINOR GIRLS

Sexual harassment of minor girls : मुंबईतील समता नगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तसंच त्याला आज न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Representative photograph
प्रातिनिधक छायाचित्र (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2024, 7:55 PM IST

मुंबई Sexual harassment of minor girls : मुंबईत बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्यात चार तसंच सहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. रहीम पठाण असं आरोपीचं नाव आहे. ही माहिती समता नगर पोलिसांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती समता नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण राणे यांनी दिली.

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य : आरोपी अनेक दिवसांपासून संधी मिळेल तेव्हा, अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करत असल्याचं उघड झालं आहे. आज पीडितेच्या कुटुंबीयांनी नजीकच्या समता नगर पोलीस ठाणं गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तत्काळ आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अवघ्या 3 तासांत आरोपीला अटक केली. आरोपी आणि पीडिता दोघंही एकाच परिसरात राहतात.

मुंबईत बदलापूर घटनेची पुनरावृत्ती : एका आरोपीनं दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला आहे. या दुर्दैवी घटनेचं वृत्त समजताच कांदिवली परिसरात खळबळ उडाली आहे. दोन वर्षांच्या मुलीवर बाहेर खेळत असताना लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना 8 ऑगस्ट रोजी घडली असून या घटनेबाबत काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीनं 14 वर्षीय मुलीसमोर अश्लील चाळे केल्याचंही समोर आलं आहे.

दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार : अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी कांदिवली परिसरात घडलीस होती. कांदिवलीतील या धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली असतानाच पुन्हा समता नगरमधील घटनेनं नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बदलापूरमधील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता मुंबईतही अशा घटना घडत असल्याचं समोर येत आहे.

'हे' वाचलंत का :

  1. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : निलंबित पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची मुंबईत बदली, उलट सुलट चर्चांना उधाण - Badlapur Sexual Abuse Case
  2. बदलापूर घटनेवरून राजकारण तापलं; विरोधकांकडून राजकारण केलं जात असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप - Badlapur School Girls Case
  3. कोल्हापूर हादरलं! बिहारी जोडप्याच्या अल्पवयीन मुलीची हत्या, मामानेच अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा अंदाज - MINOR GIRL MURDER

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.