ETV Bharat / state

प्रसिद्ध लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचं निधन - DR VEENA VIJAY DEV

प्रसिद्ध लेखिका आणि समीक्षक डॉ. वीणा देव यांचं मंगळवारी निधन झालं. सुप्रसिद्ध साहित्यिक गो.नी. दांडेकर यांच्या त्या कन्या तर मृणाल कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत्या.

Veena Vijay Dev passed away
डॉ. वीणा विजय देव यांचं पुण्यात दुःखद निधन (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2024, 7:28 PM IST

Updated : Oct 29, 2024, 8:39 PM IST

पुणे- ज्येष्ठ साहित्यिक आणि गो. नी. दांडेकर यांच्या कन्या डॉ. वीणा विजय देव यांचं पुण्यात निधन झालं असून, त्यांनी 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या पश्चात मृणाल, मधुरा अशा दोन कन्या असून, जावई, नातू, नातसून असा परिवार आहे. गेल्याच वर्षी त्यांचा अमृतमहोत्सव साजरा झाला होता. त्यांच्या जाण्यानं साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरलीय. त्यांच्या पार्थिव शरीराला पुण्यातील सहकारनगर येथील मानसमध्ये दर्शनासाठी आणले जाणार असून, त्यानंतर रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर पुढील विधी केले जातील, असंही त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलंय.

गो. नी. दांडेकर यांच्या कन्या: डॉ. वीणा विजय देव या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या. पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागप्रमुख काम पाहिलंय. तसेच तेथे त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचं कार्यसुद्धा केलंय. मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे या विषयावर सादर केलेल्या प्रबंधामध्ये त्यांनी पीएचडी ही पदवी मिळवलीय. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले असून, या संदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. 'कधी कधी', 'परतोनी पाहे', 'स्त्रीरंग', 'विभ्रम', 'स्वान्सीचे दिवस' हे त्यांचे लेखसंग्रह वाचकप्रिय आहेत. 'स्मरणे गोनिदांची' हा स्मरणग्रंथ तसेच यशवंत देव आणि डॉ. ह. वि. सरदेसाई यांची वीणा देव यांनी संपादित केलेली दोन पुस्तकं प्रकाशित आहेत. तसेच त्यांनी गो. नी. दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या 'आशक मस्त फकीर' या व्यक्तिचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळालाय. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य राहिल्यात. वीणा देव यांना मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार तसेच साईरंग प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्वगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.

मृणाल कुलकर्णी यांची आई: डॉ. वीणा देव ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा राहिल्यात. साहित्य आणि कला क्षेत्रात विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिलीत. मुलाखती घेणे, सूत्रसंचालन याद्वारे त्यांचा आकाशवाणी, दूरदर्शनवर सहभाग राहिलाय. १९७५ पासून गो. नी. दांडेकर लिखित विविध कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे ६५० हून अधिक कार्यक्रम त्यांनी केलेत. तसेच गो. नी. दा. यांच्या स्मरण-जागरणासाठी विजय देव यांच्या मदतीने त्या मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन, गो. नी. दा. यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन अशांसारखे अनेक उपक्रम राबवित असतात. त्यांच्या मृण्मयी प्रकाशनातर्फे त्यांनी गो. नी. दा. यांच्या दुर्मीळ साहित्यकृती प्रकाशित केलेल्या आहेत. वीणा देव यांचे प्रा. विजय देव यांच्याबरोबर लग्न झाले होते. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या वीणा देव व विजय देव यांच्या कन्या आहेत.

Last Updated : Oct 29, 2024, 8:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.