सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदार संघात सोमवारी शशिकांत शिंदे नावाच्या अपक्ष उमेदवारानं विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अनामत रक्कमेपोटी त्यांनी आणलेली 10 हजाराची चिल्लर मोजता मोजता अधिकाऱ्यांना घाम फुटला. यामुळे 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा', या मराठी चित्रपटातील प्रसंगाची पुनरावृत्तीच पाहायला मिळाली. या घटनेची सातारा जिल्ह्यात मोठी चर्चा सध्या सुरू आहे.
![Assembly Election 2024](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/29-10-2024/mh-str-insataraanindependentcandidatepaidadepositamountof10thousandinholidaycoins-10054_28102024224739_2810f_1730135859_533.png)
अपक्ष उमेदवारानं आणली 10 हजाराची चिल्लर : कोरेगाव विधानसभा मतदार संघात शिवसेना उबाठा पक्षाचे विद्यमान आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र, सोमवारी शशिकांत शिंदे नावाच्या एका अपक्ष उमेदवारानं आपला अर्ज दाखल करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. तसेच अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क 10 हजाराची चिल्लर आणल्यानं चिल्लर मोजताना अधिकारी घामाघूम झाले. अधिकाऱ्याची घामाघूम अवस्था पाहून नागरिकांमध्ये मात्र चांगलीच चर्चा रंगली.
![Assembly Election 2024](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/29-10-2024/mh-str-insataraanindependentcandidatepaidadepositamountof10thousandinholidaycoins-10054_28102024224739_2810f_1730135859_183.png)
कोरेगावची राजकीय करमणूक ठरते चर्चेची : साताऱ्यातील कोरेगाव मतदार संघ हा कायमच चर्चेत असतो. काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव जगताप, डॉ. शालिनीताई पाटील यांनी या मतदार संघाचं यापूर्वी नेतृत्व केलंय. कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्याला देखील आमदारकीची स्वप्नं पडतात. मतदार संघ छोटा, परंतु इच्छुक फार, असं चित्र या मतदार संघात पाहायला मिळते.
मकरंद अनासपुरेंच्या भूमिकेत शशिकांत शिंदे : राजकारणात कोण कधी कोणता डाव टाकेल आणि कोणती खेळी करेल, याचा नेम नसतो. तसाच प्रकार कोरेगावात पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या उमेदवाराला अपक्ष अर्ज भरायला लावला आहे. यामागे कोण, याचीही चर्चा रंगली आहे. दरम्यान, त्या उमेदवारानं अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क 10 हजाराची चिल्लर आणत कोरेगाव तालुक्याची करमणूक केली आहे. त्यामुळे मकरंद अनासपुरे यांच्या 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा', चित्रपटातील त्या प्रसंगाची आठवण ताजी झाली.
![Assembly Election 2024](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/29-10-2024/mh-str-insataraanindependentcandidatepaidadepositamountof10thousandinholidaycoins-10054_28102024224739_2810f_1730135859_397.png)
![Assembly Election 2024](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/29-10-2024/mh-str-insataraanindependentcandidatepaidadepositamountof10thousandinholidaycoins-10054_28102024225628_2810f_1730136388_345.png)
हेही वाचा :
- आदित्य-अमित ठाकरे बंधू नातं जपणार आणि आमदारकीही मिळवणार, वरळीतून मनसे तर माहिममधून उबाठा घेणार माघार?
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी जाहीर; अनिल देशमुखांच्या मुलाला उतरवलं रिंगणात
- महाविकास आघाडीत बिघाडी; सतीश चव्हाण यांच्या अडचणी वाढणार ? महाविकास आघाडीतील नेत्यांचा उमेदवारीला विरोध