ETV Bharat / state

नाशिकच्या सर्वेश कुशारेचा भीम पराक्रम; मक्याच्या भुशावरून थेट पॅरिस ऑलम्पिकमध्ये उडी - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics : सर्वेश कुशारे याची उंच उडी क्रीडा प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. सर्वेशनं हरियाणातील पंचकुला येथे झालेल्या स्पर्धेत 2.25 मीटर उंच उडी मारून प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळं त्याची पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालीय.

Sarvesh Kushare
सर्वेश कुशारे (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 7:27 PM IST

Updated : Jul 5, 2024, 10:17 PM IST

नाशिक Paris Olympics : नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगावचा रहिवासी असलेला सर्वेश कुशारे याची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत उंच उडी प्रकारात निवड झाली आहे. हरियाणातील पंचकुलात झालेल्या स्पर्धेत सर्वेक्षण 2.25 मीटर (7 फूट 38 मिलिमीटर) इतकी उंच उडी मारत प्रथम क्रमांक पटकावत पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता फेरी गाठली आहे. उंच उडीमध्ये ऑलिम्पिकची पात्रता गाठणारा, तो महाराष्ट्रातील पहिला उंचउडीपटू ठरला आहे.

खेळासाठी पुरेसं साहित्य नाही : सुरेशनं जागतिक क्रमवारीत 42 व्या स्थानावर झेप घेत ऑलिम्पिक पात्रतेसाठी 2.24 मीटरची पात्रता त्यानं मागं टाकत अधिक गुण पटकवले आहेत. सर्वेशनं उंच उडीत खडतर प्रवास करून थेट ऑलिम्पिकपर्यंत मजल मारणे ही त्याच्यासाठी मोठी कामगिरी आहे. आधुनिक मॅट्ससह सुविधांचा अभाव असल्यानं देवगावमध्ये काही वर्षे सराव केल्यानंतर दुखापत होऊ नये म्हणून सुविधा असलेलं कॉलेज शोधलं. त्यासाठी सर्वेशनं सांगलीतील महाविद्यालयात प्रवेशही घेतला होता. मात्र, अनेक बाबींमध्ये पुरेशी साथ न मिळाल्यानं सर्वेशने पुन्हा नाशिक जिल्ह्यातील देवगावची वाट धरली. आपल्या घरच्या शेतातील मक्याच्या भुशाच्या पोत्यांपासून मॅट तयार करून राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यानं यश मिळविलं.

अजून चांगला प्रयत्न करणार : सर्वेश कुशारेनं हरियाणातील पंचकुला येथे 29 जून रोजी झालेल्या उंच उडी स्पर्धेत 2 मीटर 25 सेंटीमीटर उंच उडी घेत प्रथम क्रमांक पटकावला. आज तो जागतिक क्रमवारीत 23 वा आला असून पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलम्पिकसाठी त्याचं स्थान निश्चित झालं आहे. सर्वेशची पत्नी रोहिणी यांनीही रिले क्रीडा प्रकारात राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे. या स्पर्धेत माझ्या शरीरानं चांगली साथ दिली, तरी पायाचा घोटा थोडासा दुखत होता. त्यामुळं 2.25 मीटर उडी मारू शकल्याचं समाधान आहे. यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेत मी 2.27 मीटरचं ध्येय गाठलं होतं. आता देखील 2.30 मीटरसाठी सराव करत आहे. त्यामुळं ऑलम्पिकमध्ये चांगला प्रयत्न करून अधिक चांगली कामगिरी करण्याचा विश्वास सर्वेश कुशारेनं व्यक्त केला.

क्रीडा शिक्षकांची मेहनत : सर्वेश कुशारेचे शाळेतील प्रशिक्षक रावसाहेब जाधव हे क्रीडाशिक्षक म्हणून काम करताय. ते गावातील विद्यार्थ्यांना उंच उडीचं मोफत प्रशिक्षण देत आहेत. खेळाच्या जोरावर त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत दाखल केलं आहे. "सर्वेश शाळेत शिकत असताना आमच्याकडं साहित्य नव्हतं. त्यामुळं अत्यंत कष्टातून त्यानं हे यश मिळवलं आहे. आजही तो गावात आल्यानंतर न चुकता सराव करतो. त्याच्या कष्टाचं चीज झालं असून त्याचं यश भावी खेळाडूंना दिशा देणारं ठरेल", असं प्रशिक्षक रावसाहेब जाधव यांनी म्हटलं आहे.

देशाचं नाव उंच करावं : "आमचं शेतकरी कुटुंब आहे. याआधी कधीही खेळाशी फारसा संबंध नव्हता, पण सर्वेशला उंच उडी प्रकाराची आवड होती. त्याच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं या खेळात नावलौकिक मिळवला. त्याचं स्वप्न पूर्ण झालं असून त्यानं पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देशाचं स्वप्न पूर्ण करावं, अशी आमची अपेक्षा" असल्याचं सर्वेशच्या कुटुंबियांनी सांगितलं.

'हे' वाचलंत का :

  1. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला खास सत्कार - felicitated by Chief Minister
  2. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 'गोल्डन बॉय'कडे मोठी जबाबदारी; भारताच्या 28 सदस्यीय ॲथलेटिक्स संघाचं करणार नेतृत्व - Paris Olympics 2024
  3. टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीनंतर अनेकांना भोवळ; मरीन ड्राईव्हवर काय होती परिस्थिती? - Team India Mumbai Victory Parade

Last Updated : Jul 5, 2024, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.