पिंपरी चिंचवड Sant Tukaram Maharaj Beej Sohal : संत तुकाराम महाराजांचा 375 वा सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणजेच तुकारामबीज सोहळा (Tukaram Maharaj) आज देहू नगरीत पार पडला. त्याच पार्श्वभूमीवर देहू मधील मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देशी-विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट संपूर्ण देहू मधील मंदिरात करण्यात आली होती.
वारकरी भक्तांनी फुलून गेला इंद्रायणी नदीचा तीर : देहूत इंद्रायणी नदी काठ भाविक भक्तांनी फुलून गेलाय. बारा वाजता श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांच्या हस्ते वैंकुठगमन मंदिरातील संत तुकाराम महाराज मंदिरात महाआरती करण्यात आली. यानंतर नांदूरकीच्या झाडाचे दर्शन घेतल्यावर हा बीज सोहळा पूर्ण झाला. त्यासाठी लाखो वारकरी देहूत दाखल झाले होते. तर इंद्रायणी तिरी स्नान करून वारकरी पुढे तुकोबांच्या दर्शनासाठी रवाना झालेत.
वाहतुकीत केला बदल : संत तुकाराम महाराज 375 व्या सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळ्याचा शुभारंभ आज श्रीक्षेत्र देहूगाव येथे झाला. लाखो वारकरी, भाविक भक्तांच्या उपस्थित हा नेत्रदीपक सोहळा झाला. या निमित्त पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागानं चोख बंदोबस्त करून वाहतुकीत बदल करण्याच आले होते. यात्रा काळात सर्व प्रकारांच्या वाहनांना देहूनगरीत प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील मल्हारी तरस प्रवेश द्वाराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देहूरोड तळेगांव वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसंच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयातील डॉग स्कॉडनं संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली होती.
हेही वाचा -
- Ashadhi Wari 2023 : संगीताचे शिक्षण नसतानाही चिमुरड्या भाऊ-बहिणीचे भजन वारकऱ्यांना करते मंत्रमुग्ध
- Sant Tukaram Maharaj Jayanti 2023 : अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत तुकाराम महाराज
- Sant Tukaram Maharaj palakhi: भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान, भाविकांमध्ये एकच उत्साह; ड्रोन कॅमेऱ्यात दृश्य कैद