ETV Bharat / state

पंतप्रधान मोदींचं भाषण सुरु असताना तिकडं जवानांच्या रक्ताचे सडे पडतात; संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut On Pm Modi - SANJAY RAUT ON PM MODI

Sanjay Raut On Pm Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन आज जनतेला संबोधित केलं. देश आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. मात्र आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना जवानाचं रक्त सांडते, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

Sanjay Raut On Pm Modi
खासदार संजय राऊत (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 15, 2024, 1:29 PM IST

Updated : Aug 15, 2024, 1:43 PM IST

मुंबई Sanjay Raut On Pm Modi : उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणावर जोरदार टीका केली. देशात चर्चेला नेहमीच वाव असतो, मात्र पंतप्रधान मोदींच्या राज्यात चर्चेला वाव आहे का, असा सवाल त्यांनी केला. लाल किल्ल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी हे 10 वर्षानंतर पहिल्यांदाच उपस्थित होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पक्षाचं नेतृत्व करतात, ते तिरंगा मानायला तयार नाहीत. केवळ पंतप्रधान असल्यामुळे त्यांना तिरंगा फडकवावा लागतो, अशी जोरदार टीका संजय राऊतांनी केली.

पंतप्रधान मोदी जवानांचं बलिदान रोखू शकले नाहीत : देशात 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना सीमेवर जवानांचं बलिदान झालं आहे. 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवानांचं सीमेवर होणारं बलिदान रोखू शकले नाहीत. आताच एका कॅप्टनसह दोन जवानांचं बलिदान झालं. या जवानांच्या बलिदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार का, असा सवाल संजय राऊत यांनी केला. आतापर्यंत 17 हल्ले झाले असून 50 पेक्षा जास्त भारतीय जवान जखमी झाले आहेत. आजदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण करताना तिकडं रक्ताचे सडे पडतात, असंही संजय राऊत म्हणाले.

370 कलम हटवून तुम्हाला फायदा झाला? : देशात सध्या वक्फ बोर्ड जमिनींचा विषय चर्चेत आहे. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "मोदी यांच्याकडं पूर्ण बहुमत नाही. आपल्याकडं पूर्ण बहुमत नसताना असे विषय चर्चेला आणणं योग्य नाही. अशानं देशातील शांतता आणि सुव्यवस्था बाधित होऊ शकते. तुम्ही बघा जम्मू काश्मीरमधून 370 कलम हतवले. त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये काय सुधारणा झाली? पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना आमच्या जवानांच्या रक्ताचे सडे पडतात. 370 कलम हटवून तुम्हाला फायदा झाला? जनतेला काय फायदा झाला?" असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी विचारला आहे.

अंडरवर्ल्डच्या टोळ्या महाराष्ट्रमध्ये सत्ता चालवतात : आजच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोजगाराबाबत देखील भाष्य केलं. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "1 लाख तरुणांना पैसे देऊन भाजपाच्या पगारावर कामाला ठेवणार. भाजपानं दलाल निर्माण केले आहेत. राजकारणामध्ये माणसं स्वतःहून येतात, लादली जात नाहीत. भाजपा हा तुरुंग आहे, त्यात अडकवलं जाते." राज्यात लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "ही तीन टोळ्याची गँग आहे. अंडरवर्ल्डच्या टोळ्या एकत्र येऊन महाराष्ट्रमध्ये सत्ता चालवतात. स्वतःच्या लोकांची दिवाळी करतात."

लाडके उद्योगपती योजना : पुढं बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी सरकारनं भूखंड दिला. आता अजुन दोन भूखंड दिले जाणार आहेत. 22 भूखंड धारावी प्रकल्प पुनर्वसनसाठी वाटले जातात. धारावी प्रकल्पाच्या नावाखाली लाडके उद्योगपती योजना राबवली जात आहे. या प्रकल्पाची शिवसेना एकही वीट रचू देणार नाही. टोळ्यांमधील वाद सुरू आहे. मुख्य गँग शिंदे फडणवीस यांच्यातील वाद पेटला आहे. या काळात हफ्ते बाजी किती झाली? ही मतांसाठी निर्माण केलेली योजना आहे. 2 महिन्यात हे सरकार पडेल. आमचं सरकार पुन्हा नव्यानं योजना सुरू करेल." अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. देवेंद्र फडणवीसांकडं अधिकार म्हणजे 'मविआ'साठी शुभसंकेत, संजय राऊतांची खोचक टीका - Sanjay Raut News
  2. 'गावगुंडांच्या सुपाऱ्या मातोश्रीवर घेतात, आम्ही घेतलेल्या सुपाऱ्या'. . .संजय गायकवाडांचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Sanjay Gaikwad Slams Sanjay Raut
  3. "महाराष्ट्रात गोंधळ घालण्यासाठी दिल्लीतील 'अब्दाली'नं..."; संजय राऊतांचा प्रहार - Sanjay Raut MNS Supari

Last Updated : Aug 15, 2024, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.