ETV Bharat / state

संसदीय अधिवेशनातून आता मोदींना पळ काढता येणार नाही, कारण...संजय राऊतांचा एनडीएवर हल्लाबोल - SANJAY RAUT News - SANJAY RAUT NEWS

Temple Leaks in Ayodhya : पहिल्या पावसातच अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी गळत असल्याची घटना निदर्शनास आल्यानं शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून भाजपावर टीका करण्यात आली आहे. संसदेचं पावसाळी, अधिवेश, लोकसभा अध्यक्षांची निवड यासह अनेक विषयावर या लेखामध्ये चर्चा त्यांनी केली आहे. दुसरीकडं खासदार संजय राऊत यांनी भाजपासह पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला.

Narendra Modi and Sanjay Raut
नरेंद्र मोदी आणि संजय राऊत (Narendra Modi and Sanjay Raut file photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 1:38 PM IST

मुंबई - Temple Leaks in Ayodhya : संसदीय पावसाळी अधिवेनात लोकसभा अध्यक्षपदावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळताहेत. शिवसेनेचं (ठाकरे गटाचे) मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातूनसुद्धा भाजपावर टीका करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोदी-शाहा आणि एनडीए सरकारवर सडकून टीका केली.

अध्यक्षांनी लोकशाहीचा गळा घोटला- "लोकसभा अध्यक्ष या पदाला फार मोठी परंपरा लाभली आहे. मात्र मागील 10 वर्षात भारतीय जनता पक्षाचे हुकूमशाहीला मानणारे लोकं लोकसभा अध्यक्ष या ठिकाणी बसले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या आधीच्या अध्यक्षांनी मागच्या वेळेला 75 ते 80 खासदारांना निलंबन करून लोकशाहीचा गळा घोटला होतं. त्यांनाच जाणीवपूर्वक पुन्हा त्या पदावर आणण्याचा प्रयत्न भाजपानं केला आहे. काल मोदींनी आणीबाणीची आठवण करून दिली होती. मात्र भाजपाच्या लोकसभा अध्यक्षांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खासदारांचे निलंबन केलं होतं. त्यांनाच तुम्ही पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडले आहे. याला काय म्हणायचे?" असा सवाल राऊतांनी उपस्थित करत, 'यांचा सुंभ जळला तरी पीळ जात नाही...' अशी टीका राऊतांनी भाजपावर केली.

मोदींना पळ काढता येणार नाही- "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना अटी-शर्ती कोण घालणार? या दोघांनी सर्वांना अटी शर्ती घातल्या आहेत. आता तर विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी बसले आहेत. त्यामुळे मोदी-शाहांना रोज राहुल गांधीं नमस्कार घालूनच पुढे जावं लागेल," असा टोला संजय राऊत यांनी लगावला. "संसदीय अधिवेशनातून आता मोदींना पळ काढता येणार नाही. कारण आता त्यांच्यासमोर राहुल गांधी उभे ठाकले आहेत. आता त्यांना प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे द्यावेच लागेल," असं संजय राऊत म्हणाले.

प्रभू श्रीरामांनी दिलेला शाप...पहिल्या पावसातच अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी गळत आहे. याबद्दल आपणाला काय वाटतं? असा प्रश्न राऊतांना विचारला असता, "आता हे जाऊन तुम्ही मोदींना विचारा. कारण मोदी मंदिरात व्रत करत होते. घाई-गडबडीने मंदिराचे लोकार्पण केले. पण पहिल्या पावसात प्रत्यक्ष गर्भगृहामध्ये पावसाचे पाणी गळत आहे, हे दुर्दैव आहे. मोठा गाजावाजा करून स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि राजकारणासाठी श्रीराम मंदिराचे उद्घाटन केले. अशी घटना होणे म्हणजे प्रभू श्रीरामांनी दिलेला मोदींना शाप आहे," असं राऊत म्हणाले.

चिंता व्यक्त करणे गुन्हा ठरतो का? " पॅलेस्टाईन देशात नरसंहार होत आहे. जगाने चिंता व्यक्त केली आहे. मग यावर बोलणे म्हणजे गुन्हा ठरतो का?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. पॅलेस्टाईनवर भारत देशाची आणि पंतप्रधानांची भूमिका काय आहे?, हे त्यांनी सांगावे," असं राऊत म्हणाले. "आज छत्रपती शाहू महाराजांच्या जंयतीनिमित्त छत्रपती शाहू महाराजांना जर भारतरत्न देण्याची मागणी होत असेल तर, त्यात टीका करावी असं काही नाही. सगळ्यांच्या आदर्श राजा होता. गरिबांचा आणि रयतेचा राजा होता," असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा -

  1. राजर्षी शाहू महाराजांना 'भारतरत्न' द्या; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी - Rajarshi Shahu Maharaj Jayanti
  2. भाडेकरूला काढण्यासाठी वृद्ध दाम्पत्याचं मुन्नाभाई स्टाईल आंदोलन, पाहा काय आहे प्रकार? - Sambhajinagar Crime News
  3. मुंबईत पदवीधर मतदानासाठी नवमतदारांचा उत्साह; मतदानासाठी सकाळपासूनच रांगा - Vidhan Parishad Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.