मुंबई: सिंचन घोटाळ्याप्रकरणी तपास झाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे दिवंग नेते, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर आरोप केल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, " आर. आर. पाटील अत्यंत प्रामाणिक आणि कर्तबगार व्यक्ती होते. त्यांनी गृहमंत्री म्हणून कधीच चुकीचं काम केलं असेल असं आम्हाला वाटत नाही. त्यांचे केस फार लहान असल्याने ते केसाने गळा कापू शकत नाहीत," असा टोलाही राऊत यांनी अजित पवारांना लगावला आहे.
केस लहान आल्यामुळे...या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, " माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्यावर सही केल्याचे अजित पवारांनी जनतेला दाखवले. तसेच फडणवीस यांनी त्यांना सही केल्याचे दाखवले. याकरता आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. कारण या दोघांनी संविधानाप्रमाणे गोपनीयतेची शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर अशी माहिती सार्वजनिक करणे, हा गोपनीयतेचा भंग असून फार मोठा गुन्हा आहे. या कारणानं राज्यपालांनी या दोघांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश दिले पाहिजेत."
बंडखोरांची समजूत काढण्याचा पूर्ण प्रयत्न- महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, " निवडणूक अर्ज मागे घेण्यासाठी अजून मुदत आहे. ९० टक्के नाराजांची समजूत काढण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे. आता आम्ही एकत्र बसणार आहोत. आमच्या प्रत्येक घटक पक्षानं उमेदवारी अर्ज भरलाय. त्यांची समजूत काढू. महाविकास आघाडीला निवडणूक जिंकायची असल्याकारणानं दोन-चार जागा मित्रपक्षानं जास्त लढवल्या किंवा जिंकल्या तर इतर घटक पक्षांना त्यात वाईट वाटण्याचं कारण नाही. विदर्भामध्ये काँग्रेस मजबूत असल्याकारणानं तिथे त्यांच्या जास्त जागा आहेत. या राज्यात आम्हाला बदल घडवायचा आहे. या कारणानं आम्हाला एकत्र राहणं फार गरजेचं आहे. बंडखोरी केलेल्या उमेदवाराची समजूत काढण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. त्यात यशस्वी होऊ."
हेही वाचा-