मुंबई Shivaji Maharaj Waghnakh : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मुस्लिम समुदाय याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. काल लंडनहून साताऱ्यात आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नखांवरून राजकारण सुरू झालं आहे. याबाबत शिवसेना उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा हल्लाबोल करत सरकारला धारेवर धरलं आहे. मुंबईत ते बोलत होते.
हिमंता सरमा यांची डीएनए टेस्ट करा : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी २०४१ पर्यंत मुस्लिम राज्यात बहुसंख्य बनतील आणि ते कोणी रोखू शकत नाही, असा दावा केला आहे. त्याचबरोबर मुस्लिमांची लोकसंख्या रोखण्यासाठी राहुल गांधी यांना त्यांचे ब्रँड अँबेसिडर बनवलं पाहिजे, कारण ते त्यांचे ऐकतात असंही वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. सरमा यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, आसामच्या मुख्यमंत्र्यांची डीएनए टेस्ट करा तेच बीजेपीचं कॅरेक्टर आहे. देशातील एकता तोडली जात आहे. भाजपा सोबत असलेले सहयोगी घटक पक्ष हे चोर आहेत. सत्तेचे दलाल आहेत. चंद्राबाबू नायडू, नितिश कुमार, चिराग पासवान यांची काय भूमिका आहे ती त्यांनी उघडपणे सांगावी, असंही राऊत म्हणाले.
श्रध्देचा व्यापार सुरू आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हटलं आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्यांनी शत्रूंशी हात मिळवणी केली. ज्यांनी हिंदुरहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे खंजीर खुपसला. हे आम्हाला नकली बोलणार. मुळात वाघनखं ऐतिहासिक आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखर ती वाघनखं वापरली असतील तर आम्ही त्याला प्रणाम करतो. परंतु इतिहासतज्ञ त्याचबरोबर लंडनचे म्यूझियम सांगत आहे की, ही शिवाजी महाराजांचीचं वाघनखं आहेत याची खात्री नाही. या वाघनखांविषयी कोणीच खात्रीने सांगू शकत नाही. १९९१ नंतर ज्या पद्धतीने भाजपानं कुठलंही पाणी बाटलीत भरून त्या गंगाजलाच्या बाटल्या आहेत म्हणून देशभर विकत होते. त्या पद्धतीने या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जी महाराष्ट्राच्या मनात श्रद्धा आहे, त्या श्रध्देचा व्यापार सुरू केला आहे. वाघनखं ही काही राजकारण करण्याची वस्तू आहे का? तुम्ही लोकांना फसवत आहात, आणि ही फसवणूक तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही.
भाजपाचा कुठल्याही इतिहासाशी संबंध काय - संजय राऊत पुढे म्हणाले की, वाघ नखांचा अपमान एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करत आहेत. हे डुप्लिकेट असल्याने यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे. असा आरोपही ही संजय राऊत यांनी केला आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इतिहासाशी संबंध काय? भारतीय जनता पक्षाचा कुठल्याही इतिहासाशी संबंध आला आहे का? त्यांचा संबंध ना स्वातंत्र्य संग्रामाशी आला, ना राज्याच्या ऐतिहासिक संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी आला. त्यांचा संबंध ना आणीबाणीतील संघर्षाशी आला. आणीबाणीमध्ये सुद्धा सोशालिस्ट समाजवादी पक्षाचेच लोक तुरुंगात होते. बाकीचे लोक संघाचे जे होते ते माफी मागून बाहेर आले आहेत, असंही राऊत म्हणाले.
हेही वाचा