अमरावती Sanjay Raut Controversial Statement : अहमदनगर येथील जाहीर सभेत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची दिलेली धमकी ही प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे. शिवाय, पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानांवर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे. अशा वक्तव्यांमुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
तर यांच्याही जीवितास धोका : संजय राऊत यांचे पंतप्रधान यांच्या विरोधातील विधान मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या तत्त्वांच्या विरोधात आहे हे उघड आहे आणि या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे. संजय राऊत यांच्या या वक्त्याव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उच्च मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या जीवितास धोका आहे हे स्पष्ट होते. अशा विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते. आम्ही निवडणूक आयोगाला आणि संबंधित अधिकारी यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा भडकाऊ भाषणाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची विनंती पोलिसांकडे करण्यात आली असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी म्हटले आहे.
भाजपा कार्यकर्त्यांमध्ये रोष : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संजय राऊत यांनी केलेल्या गैर वक्तव्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. बडनेरा येथील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते डॉ. वीरेंद्र ढोबळे, राजु शर्मा, संजय कटारिया, गजेंद्र भैसे, अन्नू शर्मा, उमेश निलगिरे, नरेश धमाई, टेकचंद केसवानी, संतोष मिश्रा, सूरज जोशी, मनोज पंड्या, अंकुर सिंघई, सुनील लोयबरे, निलेश पवार, अशोक पंचारे, मनीष अग्रवाल, महेश पंचारे, तुषार अंभोरे, अकेंश गुजर, अनूप वांगे, छाया अंबाडकर, तृप्ती वाट, सतनामकौर हुडा, रोशनी वाकळे, पूजा जोशी, अल्का भारती यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी पोलिसांकडे तक्रार देताना केली आहे.
हेही वाचा :
- लाकडी घाण्यावरील तेलाला वाढली मागणी; कोणत्या तेलामुळं वाढला कर्करोग अन् हृदयविकाराचा धोका? - Best Cooking Oil
- मोदी-शाहांमुळं शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळालं, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? - CM Eknath Shinde Shivsena
- "2016 मध्येच भाजपाबरोबर जाणार होतो, पण..."; 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट - Sunil Tatkare Exclusive